Crime News: रात्री पत्नीने प्रियकरासोबत प्रस्थापित केले होते शरीरसंबंध, तेवढ्यात आला पती आणि घडले थरकाप उडवणारे हत्याकांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:14 IST2022-01-06T19:13:54+5:302022-01-06T19:14:38+5:30
Crime News: एका महिलेचा पती कामानिमित्त महिनोनमहिने घराबाहेर राहायचा. यादरम्यान, सदर महिला आणि अन्य एका व्यक्तीमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, या महिलेला तिच्या पतीने प्रियकरासोबत संबंध प्रस्थापित करताना पाहिले. त्यानंतर जे काही घडले ते थरकाप उडवणारे होते.

Crime News: रात्री पत्नीने प्रियकरासोबत प्रस्थापित केले होते शरीरसंबंध, तेवढ्यात आला पती आणि घडले थरकाप उडवणारे हत्याकांड
पाटणा - बिहारमधील लखीसरायमध्ये अनैतिक संबंधांमधून झालेल्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा पती कामानिमित्त महिनोनमहिने घराबाहेर राहायचा. यादरम्यान, सदर महिला आणि अन्य एका व्यक्तीमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, या महिलेला तिच्या पतीने प्रियकरासोबत संबंध प्रस्थापित करताना पाहिले. त्यानंतर जे काही घडले ते थरकाप उडवणारे होते.
ही घटना लखीसराय जिल्ह्यातील मेदनीचौक ठाण्याच्या ऋषी पहाडपूर गावात घडली आहे. गावातून काही दिवसांपूर्वी एक तरुण बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बुधवारी रोहितचा मृतदेह नदीत सापडला होता. त्यानंतर हा मृतदेह पोलिसांना पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर या तरुणाचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पुरन पासवान पाटणामध्ये गवंडीकाम करतो. तसेच तो कामानिमित्त बराचकाळ घराबाहेर राहत असे. यादरम्यान, त्याच्या पत्नीचे संबंध शेजारी राहणाऱ्या गावातीलच एक तरुण रोहित यादव याच्याशी प्रस्थापित झाले. अचानक ३१ डिसेंबर रोजी पूरन पासवान रात्री पाटणा येथून आला. तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि रोहित हे आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. तेव्हा त्याने पत्नीला काही केले नाही. मात्र रोहित यादव याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला ठार मारले, तसेच त्याचा मृतदेह नदीत फेकला. या कामामध्ये त्याला त्याच्या पत्नीनेही मदत केली.
दरम्यान, रोहित बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, फोनकॉलमधून रोहितचे अखेरचे बोलणे हे पिंकी देवी हिच्याशी झाल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी तिला चौकशीसाठा बोलावले आणि या हत्येला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी पुरन पासवान यालाही अटक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरन पासवान आणि पिंकी देवी यांनी मिळून रोहित यादव याची हत्या केली. तसेच मृतदेह हा नदीमध्ये फेकून दिला होता.
पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीवरून एसडीआरएफच्या टीमच्या मदतीने रोहितचा मृतदेह हा नदीमधून बाहेर काढला. दरम्यान, पिंकी देवी या महिलेवर याआधीही अनेक तरुणांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप होत होता. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.