शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नी हातात मिळेल त्याने मारते, धमक्या देते, ब्लॅकमेल करते, प्रिंसिपल पतीचे गंभीर आरोप, कोर्टात केली अशी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:23 IST

Crime News: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवानीमध्ये एक विचित्र आणि कौटुंबिक हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे राहणाऱ्या एका शाळेच्या प्रिंसिपलनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.

जयपूर - राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवानीमध्ये एक विचित्र आणि कौटुंबिक हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे राहणाऱ्या एका शाळेच्या प्रिंसिपलनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आपल्याला तवा, दांडक्यांनी मारहाण करते, असे त्यांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच आपल्या आरोपांना पुरावे मिळावेत म्हणून त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांमध्ये दिसत असलेले चित्रिकरण पाहून सर्वांना धक्का बसला आहे. या प्रिंसिपलना त्यांची पत्नी दररोज मारहाण करून घराबाहेर काढते. एवढेच नाही तर केसमध्ये अडवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करते, असे या पीडित प्रिंसिपलनी कोर्टात सांगितले. आता या प्रिंसिपलनी कोर्टात सुरक्षा देण्यासाठी विनंती केली आहे. तसेच आता कोर्टाने त्यांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वसाधारणपणे कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप हे महिलांकडून केले जातात. मात्र भिवानीमध्ये पुरुषच कौटुंबिक हिंसाचाराची शिकार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची शिकार झालेले अजित सिंह यादव हे प्रिंसिपल आहेत. त्यांनी हरियाणामधील सोनिपत येथील सुमन हिच्याशी लव्ह मॅरेज केले होते. त्यानंतर काही दिवसांपर्यंत त्यांच्या जीवनात सारं काही सुरळीत सुरू होते. मात्र हळूहळू पत्नीने तिचं खरं रूप दाखवलं. तसेच ती पतीवर अत्याचार करू लागली. अखेर त्रस्त प्रिंसिपल यांनी आता भिवाडी न्यायालयामध्ये आपल्या सुरक्षेची मागणी करत न्याय देण्याची विनंती केली.

पत्नीकडून होत असलेल्या मारहाणीमध्ये पती अजित सिंह यांना शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. मात्र लोकलाजेस्तव आणि शिक्षकी पेशाचा गरिमा विचारात घेऊन ते इकडे तिकडे उपचार करून घेत होते. मात्र सर्व हद्द ओलांडली गेली तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली. अजित सिंह यांना एक मुलगाही आहे. त्यांनी पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर केले. त्यामध्ये सुमन ही मुलासमोरच पती अजित सिंह यांना मारहाण करताना दिसत आहे. मात्र आपल्या शिक्षकी पेशाचा विचार करून अजित सिंह यांनी कधीही पत्नीविरोधात हात वर उचलला नाही. मात्र या सर्व प्रकारामुळे अजित सिंह मानसिकदृष्ट्या आजारी पडले आहेत. दरम्यान, सुमन ही तिच्या अमेरिकेतील भावाच्या सांगण्यावरून सारं काही करते, असा आरोप अजित सिंह यांनी केला आहे. 

टॅग्स :FamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय