Crime News: आक्षेपार्ह स्थितीत व्हिडीओ कॉल, सेक्सची ऑफर, ब्लॅकमेल, भाजपा नेत्याने असा हाणून पाडला हनिट्रॅपचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 18:31 IST2022-08-19T18:31:08+5:302022-08-19T18:31:29+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील भाजपाचे माजी खासदार भारतेंद्र सिंह यांनी पोलिसांकडे हनिट्रॅपसंदर्भात तक्रार दिली आहे.

Crime News: आक्षेपार्ह स्थितीत व्हिडीओ कॉल, सेक्सची ऑफर, ब्लॅकमेल, भाजपा नेत्याने असा हाणून पाडला हनिट्रॅपचा डाव
लखनौ - उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील भाजपाचे माजी खासदार भारतेंद्र सिंह यांनी पोलिसांकडे हनिट्रॅपसंदर्भात तक्रार दिली आहे. एका अज्ञात महिलेने त्यांना हनिट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांना ब्लॅकमेल केले. या महिलेने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लैंगिक संबंध बनवण्याची ऑफर दिली, असे भाजपाच्या माजी खासदारांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भातील तक्रार नजिबाबाद पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार माजी भाजपा खासदारांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मला एका अज्ञात नंबरवरून अनेक व्हिडीओ कॉल आले. मी अनेकदा फोन डिस्कनेक्ट केला. मात्र मला वारंवार फोन केले गेले. त्यानंतर मला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज मिळाला, ज्यामध्ये संबंधित व्यक्तीने आपण महिला असल्याचा दावा करत मला फोन उचलण्यास सांगितले.
ते म्हणाले की, जेव्हा मी शेवटचा फोन उचलला तेव्हा या महिलेने मला लैंगिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. तेव्हा मी फोन त्वरित डिस्कनेक्ट केला. मात्र मवा पुन्हा एक कॉल आला. त्यामध्ये ती आक्षेपार्ह स्थितीत होती. मी पुन्हा फोन डिस्कनेक्ट केला, त्यानंतर माझ्या चेहऱ्याशी छेडछाड केलेले काही मॉर्फ्र्ड केलेले फोटो मला पाठवण्यात आले.
त्यांनी पुढे आरोप केला की, या महिलेने फोटो लीक करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बिजनौर येथील एसपी दिनेश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी कुंवर भारतेंद्र सिंह यांच्या तक्रारीच्या आधारावर आयटी अधिनियममधील कलम ६७ आणि आयपीसी कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे आणि आम्ही आरोपी महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही लोकांना आवाहन करतो की, आपल्या फोनवर कुठलाही व्हिडीओ कॉल उचलू नका.
एसपींनी सांगितले की, सोशल मीडियावर अशा प्रकारचे घोटाळे ही सामान्य बाब आहे. याच्याशी संबंधित महिला ह्या बहुतांश रात्री व्हिडीओ कॉल करतात. जेव्हा कुणी कॉल करतो, तेव्हा तो त्या व्हिडीओचा भाग बनून जातो. नंतर गँगचे सदस्य खंडणीसाठी त्यांना ब्लॅकमेल करतात.