Crime News: व्हिडोओ काॅल करून मुलीला कपडे उतरायला लावले, नंतर ते अश्लील फोटो मुलीच्या मामाला पाठवले, युवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 22:06 IST2021-09-23T22:05:43+5:302021-09-23T22:06:23+5:30
Crime News: एका सोळा वर्षांच्या मुलीशी तरूणाने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी व्हिडीओ काॅल करून मुलीला कपडे उतरायला लावले. एवढेच नव्हे तर...

Crime News: व्हिडोओ काॅल करून मुलीला कपडे उतरायला लावले, नंतर ते अश्लील फोटो मुलीच्या मामाला पाठवले, युवकावर गुन्हा दाखल
सातारा - एका सोळा वर्षांच्या मुलीशी तरूणाने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एके दिवशी व्हिडीओ काॅल करून मुलीला कपडे उतरायला लावले. एवढेच नव्हे तर याचे रेकाॅर्डिंग करून फोटो संबंधित मुलीच्या मामाला पाठविल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आलीय.
राहुल सुर्वे उर्फ सत्यम मिश्रा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित सोळा वर्षाच्या मुलीला एके दिवशी व्हॅटसअॅपवर राहुल सुर्वेने मेसेज केला. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मात्र, त्यानंतर संबंधित मुलीने त्याला प्रतिसाद देेणे बंद केले. त्यामुळे त्याने मुलीच्या व्हाॅट्सअॅपवर अश्लील मेसेज केले, मैत्रीबाबत घरच्यांना सांगेन अशी त्याने धमकी देत व्हीडिओ कॉल करून कपडे उतरवायला लावले व त्याचे अश्लील फोटो तयार करून मामाला पाठविले. या प्रकारानंतर मुलीच्या नातेवाइ व घरातल्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून राहुल सुर्वेचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, त्याचा मोबाइल बंद असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. लवकरच तो हाती लागेल, असे पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले. असे संबंधीत मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक शेख हे अधिक तपास करत आहेत.