Crime News : पसंत नसलेल्या पतीचा झोपेतच आवळला गळा, अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी झाले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:46 IST2022-11-14T11:45:38+5:302022-11-14T11:46:06+5:30
Crime News; अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी लग्न झालेले. हातावरील मेहंदीचे रंग ताजे होते. मात्र, सुखी संसाराची स्वप्नं रंगवत झोपी गेलेल्या पतीला पत्नीने गळा दाबून ठार मारले.

Crime News : पसंत नसलेल्या पतीचा झोपेतच आवळला गळा, अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी झाले होते लग्न
गेवराई : अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी लग्न झालेले. हातावरील मेहंदीचे रंग ताजे होते. मात्र, सुखी संसाराची स्वप्नं रंगवत झोपी गेलेल्या पतीला पत्नीने गळा दाबून ठार मारले. पती पसंत नसल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.
पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय २४) असे मृताचे नाव आहे. त्याची आई नीलाबाई राजाभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांचा मुलगा पांडुरंग याचा विवाह पौळाचीवाडी (ता. गेवराई) येथील शीतल हिच्याशी झाला होता. ७ नोव्हेंबरला रात्री शीतल व पांडुरंग हे आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रात्री साडेदहा वाजता शीतल ओरडत खोलीबाहेर आली. तुमच्या लेकाला काही तरी झाले आहे... ते बोलत नाहीत.. असे ती म्हणत हाेती. तेव्हा पांडुरंग बेशुद्ध होता. रुग्णालयात नेले. असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या गळ्यावर व्रण होते.