Shivali Parab : धक्कादायक! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा आयफोन चोरट्यांनी हिसकावला
By नितीन पंडित | Updated: August 22, 2022 18:33 IST2022-08-22T18:10:15+5:302022-08-22T18:33:10+5:30
Marathi Actress Shivali Parab : दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकल रिक्षाच्या अगदी जवळ घेत अभिनेत्रीच्या हातातील आयफोन 13 हा किमती मोबाईल खेचून पोबारा केला आहे.

Shivali Parab : धक्कादायक! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा आयफोन चोरट्यांनी हिसकावला
भिवंडी - भिवंडी शहरात मोबाईल चोरट्यांचा त्रास वाढत असून आता महामार्गावरील प्रवाशांच्या हातातून मोबाईल हिसकावण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" या कार्यक्रमामधील अभिनेत्रीच्या हातातील मोबाईल मोटरसायकल चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली रविवारी घडली असून याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अभिनेत्रीने मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण येथे राहणाऱ्या शिवाली दिपक परब (Shivali Parab) या अभिनेत्री कल्याण येथून मिरारोड येथे शूटिंगसाठी ओला रिक्षाने सकाळी पाऊणे नऊ वाजता जात असताना भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास रेल्वे ब्रिजच्याजवळ, पिंपळासफाटा येथे रिक्षा आली असता रिक्षाच्या पाळतीवर असलेल्या मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकल रिक्षाच्या अगदी जवळ घेत अभिनेत्रीच्या हातातील आयफोन 13 हा किमती मोबाईल खेचून पोबारा केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री शिवाली परबने कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.