Crime News : महिलेनं मोजे विकत घेतले अन् दुकानदाराला संध्याकाळी घरी बोलवले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:54 IST2022-01-19T20:46:15+5:302022-01-19T20:54:06+5:30
हनुमानगंज डाढा येथील राजू साहूनामक तरुण गल्लीबोळात जाऊन कपडे विकायचा व्यवसाय करायचा

Crime News : महिलेनं मोजे विकत घेतले अन् दुकानदाराला संध्याकाळी घरी बोलवले, मग...
ग्वालियर - जिल्ह्यातील डबरा येथील एका महिलेनं कापड दुकानदाराला घरी बोलावून त्याचा व्हिडिओ बनवला. महिलेनं दुकानदाराकडून उधारीवर मोजे घेतले होते. तसेच, याचे पैसे घेण्यासाठी संध्याकाळी घरी या, असेही सांगितले होते. त्यानुसार, दुकानदार जेव्हा महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा पेयातून मादक पदार्थ देऊन न्यूड व्हिडिओ बनवला. आता, त्या महिलेकडून संबंधित दुकानदारास ब्लॅकमेल करण्यात येत आहे.
हनुमानगंज डाढा येथील राजू साहूनामक तरुण गल्लीबोळात जाऊन कपडे विकायचा व्यवसाय करायचा. एकदिवस अगोदर तो आंबेडकर कॉलनीत पोहोचला, तेथे एका महिलेनं त्याच्याकडून शूजसाठी लागणारे मोजे विकत घेतले. तसेच, पैसे घेण्यासाठी युवकाला संध्याकाळी घरी येण्याचे सूचवले. अगोदरचीच ओळख असल्याने कपडा व्यवसायिक राजूने संध्याकाळी महिलेचं घर गाठलं. त्यावेळी, महिलेनं घरी पोहचल्यानंतर राजूला पाणी दिले, पण पाणी पिल्यानंतर युवक बेशुद्ध पडला होता. त्यादरम्यान, महिलेनं युवकाच्या अंगावरील कपडे काढून न्यूड व्हिडिओ बनवला.
मला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा माझ्या अंगावर कपडे नव्हते. त्यानंतर, महिलेनं मला 50 हजार रुपये मागितले. मात्र, माझी परिस्थिती एवढे पैसे देण्याची नसल्याने मी डबरा पोलीस ठाणे गाठल्याचे युवकाने म्हटले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महिलेसह तिचा साथीदार रामेश्वर यांच्याविरुद्ध कलम 384 नुसार ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेनं अगोदरही अनेकांना अशाच रितीने ब्लॅकमेल केल्याचे पोलीस ठाण्याचे प्रभारी विनायक शुक्ला यांनी सांगितले. मात्र, कुणीही तक्रार दाखल केली नाही, त्यामुळेच महिलेनं वारंवार असे गुन्हे केले.