Crime News: ज्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली त्याच्यावरच महिला कॉन्स्टेबलने लावला बलात्काराचा आरोप, त्यानंतर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:34 IST2022-04-14T13:34:06+5:302022-04-14T13:34:33+5:30
Crime News: हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यामध्ये पोलीस लाईनमधील सरकारी निवासस्थानामध्ये राहणाऱ्या एका महिला शिपायाला भीती दाखवून रात्री उशिरा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News: ज्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली त्याच्यावरच महिला कॉन्स्टेबलने लावला बलात्काराचा आरोप, त्यानंतर..
चंडीगड - हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यामध्ये पोलीस लाईनमधील सरकारी निवासस्थानामध्ये राहणाऱ्या एका महिला शिपायाला भीती दाखवून रात्री उशिरा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी महिला शिपायाच्या तक्रारीवरून बलात्कार करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री बाहेरील तरुणाने पोलीस लाईनमध्ये केलेली घुसखोरी आणि बलात्कार करून पळण्याच्या घटनेला पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. आता पोलीस लाईनचे आयआर याचा तपास करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री पोलीस लाईनमधील सरकारी आवासामध्ये पोलीस शिपायाला भीती दाखवून तिच्यावर अत्याचारा करण्यात आला होता. या महिला शिपायाने कोर्ट काँप्लेस्क चौकी पोलिसांना सांगितले की, ती हरियाणा पोलिस दलातीत शिपाई आहे. तसेच पोलीस लाईनमध्ये सरकारी निवासामध्ये राहते. काल मध्यरात्री दरवाजावर खडखड ऐकू आली. त्यावेळी दरवाजावर तिच्या ओखळीमधील अक्षय उर्फ मोनू उभा होता. त्याने बहाणा बनवून दरवाजा उघडून घेतला.
त्यानंतर त्याने घाबरवून तिला खोलीमध्ये आणले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच झाला प्रकार कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आणि पळून गेला. पोलिसांना या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
एसआय संदीप कुमार यांनी सांगितले की, पोलीस लाईनमध्ये राहत असलेल्या महिला शिपायाने तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. त्याआधारावर रिपोर्द नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासामध्ये महिला शिपाई आणि आरोपी युवक लिव्ह इनमध्ये राहत होते असे समोर आले आहे. दरम्यान, काही गोष्टींवरून वाद झाल्यानंतर अत्याचाराची तक्रार देण्यात आली. आता पीडितेची वैद्यकीय चाचणी करून मॅजिस्ट्रेटसमोर साक्ष नोंदवली जाईल.