Crime News: विकृतीपणाचा कळस, ६५ वर्षीय वृद्धाचा पाळीव कुत्रीवर अत्याचार
By राजू इनामदार | Updated: August 27, 2022 22:22 IST2022-08-27T21:56:28+5:302022-08-27T22:22:04+5:30
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगर शहरालगत टाकळकरवाडी येथे भिवसेन टाकळकर राहतात.म

Crime News: विकृतीपणाचा कळस, ६५ वर्षीय वृद्धाचा पाळीव कुत्रीवर अत्याचार
राजेंद्र मांजरे
पुणे/राजगुरूनगर : खेड तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय नागरिकाने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर (रा. टाकळकरवाडी ता. खेड ) असे या विकृताचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगर शहरालगत टाकळकरवाडी येथे भिवसेन टाकळकर राहतात. राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवुन घरामध्ये घेवुन वेळोवेळी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार टाकळकर करत होता. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.