Crime News: धक्कादायक घटना! महिला पोलिसाने लुटारूंना रोखले, चोरट्यांनी तिला धावत्या ट्रेनमधून फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:19 IST2022-06-15T16:18:07+5:302022-06-15T16:19:06+5:30
Crime News: बिहारमधील कटिहार जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही दरोडेखोरांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धावत्या ट्रेनमधून धक्का देऊन बाहेर फेकले. यामध्ये सदर महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे.

Crime News: धक्कादायक घटना! महिला पोलिसाने लुटारूंना रोखले, चोरट्यांनी तिला धावत्या ट्रेनमधून फेकले
पाटणा - बिहारमधील कटिहार जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही दरोडेखोरांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धावत्या ट्रेनमधून धक्का देऊन बाहेर फेकले. यामध्ये सदर महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे लुटार धावत्या ट्रेनमधे लुटपाट करत होते. त्यावेळी सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी तिला ट्रेनमधून धक्का देत बाहेर फेकले. त्यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, लुटारूंची ही टोळी फरार झाली आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यालाही धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कटिहार येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चोरट्यांच्या एका टोळीतील सदस्यांनी मोबाईल आणि पर्स चोरून पळ काढत असताना धक्का दिला. सदर महिला कर्मचारी त्यावेळी ट्रेनमध्ये तैनात होती. दरम्यान, या महिला पोलिसा कर्मचाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार गौशाला रेल्वे फाटकाजवळ एका टोळीतील लुटारू प्रवाशांचं सामान घेऊन पळत होते. मी त्यांना विरोध केला. त्यावेळी त्यांनी मला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला. दरम्यान, या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आरती कुमारी असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या चोरट्यांनी तिच्या हातातून मोबाईल पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्यांना रोखत एका चोरट्याला पकडले. मात्र त्याने तिला धक्का देऊन ट्रेनबाहेर फेकले आणि फरार झाला. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली.