ऐनवेळी वराचे संबंध उघड; मारहाण करत लग्न मोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:07 PM2022-05-03T13:07:24+5:302022-05-03T13:07:50+5:30

गुजरातमधून थेट नवरीला फोन, वराला कोठडी.

crime news The bridegrooms relationship is revealed Beating and broke up the marriage | ऐनवेळी वराचे संबंध उघड; मारहाण करत लग्न मोडले

ऐनवेळी वराचे संबंध उघड; मारहाण करत लग्न मोडले

googlenewsNext

मलकापूर : चार महिन्यांपूर्वी ठरलेल्या लग्नाच्या ऐन पूर्वसंध्येला वराच्या चारित्र्याबद्दल वधूकडील मंडळीला माहिती मिळाल्याने नवरीने त्याला जाब विचारला असता, नियोजित वराने नवरीसह तिच्या घरच्या मंडळींना धक्काबुक्की करत लग्न मोडण्याचा प्रकार मलकापुरात शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी नवरोबाविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मलकापुरातील एका मुलीचे मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील अमोल गणेश पारेकर याच्याशी १ मे रोजी लग्न ठरले होते. तो गुजरातमधील सुरत येथे रेल्वेत लोको पायलट पदावर कार्यरत आहे. ३० एप्रिल रोजी वधू पक्षाकडील मंडळींना गुजरातमधून दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली. त्यामध्ये होणाऱ्या जावयासोबत विवाहितेचे अफेअर असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली. त्यासाठी पुरावा म्हणून गुजरातमधील विवाहितेसोबतचे अमोल पारेकर याचे फोटो नवऱ्यामुलीच्या मोबाईलवर पाठवले. फोटो पाहून वधू पक्षाकडील मंडळीला हादरा बसला. 

नियोजित वराकडून फसवणूक होत असल्याचे पाहता नवरीने फोन करून अमोल पारेकरला जाब विचारला. त्यावेळी त्याच्या  बोराखेडी येथील घरी नानमुखाची तयारी सुरू होती. दारातील मांडवात नवरदेवाला हळद लागलेली होती. नवरीने जाब विचारल्याचा राग आल्याने हळद लागलेला, हातावर मेहंदी काढलेला नवरदेव काही जणांना घेऊन मलकापुरातील नवरीच्या घरी पोहोचला.  

नवरीचे केस ओढले
नवऱ्या मुलीचे केस ओढून आता लग्न करत नाही, आपले लग्न तुटले, असे म्हणत निघून गेला. या प्रकाराची तक्रार मुलीच्या आईने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव अमोल पारेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नानमुखाच्या दिवशी लगीन घरातून नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात आणली.

Web Title: crime news The bridegrooms relationship is revealed Beating and broke up the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.