Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:02 AM2022-04-20T08:02:54+5:302022-04-20T08:03:36+5:30

Crime News: एका आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारल्याचे समोर आले आहे. या महिलेने स्वत:च्या तीन मुलांना मारल्यानंतर स्वत:ही टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

Crime News: The birth mother drowned her three children, shocking reasons came to light | Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर 

Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर 

googlenewsNext

चंडीगड - हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारल्याचे समोर आले आहे. या महिलेने स्वत:च्या तीन मुलांना मारल्यानंतर स्वत:ही टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ही घटना नारनौल सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबलाना गावातील आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले. तर त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. मिळालेल्य माहितीनुसार ही महिला मध्य प्रदेशमधील होती. या खळबळजनक घटनेबाबत पोलिसांकडून अद्यापपर्यंत फार माहिती देण्यात आलेली नाही. तसेच कुठलेही विधान करणे पोलीस टाळत आहेत.

मृत महिलेच्या दिराने सदर महिला आणि तिच्या पतीमध्ये मतभेद होते. मात्र आत्महत्येपर्यंत प्रकरण जावे एवढे मतभेद नव्हते, अशी माहिती दिली आहे. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी अॅडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ  पोलीस संदीप कुमार मलिक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले. दरम्यान, स्वत:च्या तीन मुलांची हत्या करताना एका आईच्या काळजाला पाझर कसा नाही फुटला, तसेच तिनेही कशी काय आत्महत्या केली, याबाबतची चर्चा गावात सुरू आहे.  

Web Title: Crime News: The birth mother drowned her three children, shocking reasons came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.