Crime News: भयंकर! तीन महिलांनी रचला हत्येचा कट, पतींनाही घेतलं सोबत, त्यानंतर घडले भयानक हत्याकांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:13 IST2022-10-06T15:12:59+5:302022-10-06T15:13:25+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यात हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे तीन महिलांनी मिळून एका व्यक्तीच्या हत्येची योजना आखली. त्यांनी या कटामध्ये पतींनाही सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची हत्या केली.

Crime News: भयंकर! तीन महिलांनी रचला हत्येचा कट, पतींनाही घेतलं सोबत, त्यानंतर घडले भयानक हत्याकांड
लखनौ - उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यात हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे तीन महिलांनी मिळून एका व्यक्तीच्या हत्येची योजना आखली. त्यांनी या कटामध्ये पतींनाही सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची हत्या केली. पोलिसांनी जेव्हा या हत्याकांडाचा उलगडा केला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
मृत कमलेश हा रेल्वेमध्ये कामाला होता. त्यांची पत्नी पूरन देवी यांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कमलेश औषध आणण्यासाठी घरातून निघाला होता. तो बराच वेळ परत आला नाही, त्यामुळे त्याची पत्नी त्रस्त झाली. कमलेशचा मोबाईलही बंद होता. तिने आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा एका महिलेने कमलेश हा दीनदयालसोबत दुचाकीवरून कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्यानंतर तिने पोलिसांत जाऊन तक्रार दिली.
कमलेशला दीनदयालसोबत शेवटचे पाहण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दीनदयाल याने कमलेशच्या हत्येची गोष्ट मान्य केली. त्यानंतर त्याने जी कहाणी सांगितली ती धक्कादायक होती. मृत कमलेशने दीनदयालकडून ३५ हजार रुपये उसणे घेतले होते. वर्ष झाल्यानंतरही त्याने ते परत केले नव्हते. ते पैसे परत मिळवण्यासाठी दीनदयाल आणि त्याचे दोन भाऊ दयाराम आणि हीरालाल यांनी चर्चा केली. त्यावेळी या तिघांच्याही पत्नींनी कमलेशची हत्या करण्याची कल्पना बोलून दाखवली. तसेच त्यासाठी पतींना राजी केले.
त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार दीनदायल कमलेशला घरी घेऊन आला. त्याच्यासाठी भोजनाची आणि मद्याची व्यवस्था केली. भोजन झाल्यानंतर त्यांनी कमलेशची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरातच पुरून टाकले. दरम्यान, मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच कमलेशचा मृतदेह आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.