12 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, महिलेला नात संपवायचं होतं, नाराज पार्टनरने भरदिवसा केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 18:26 IST2022-12-15T18:16:24+5:302022-12-15T18:26:44+5:30
केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचे समोर आले आहे. 12 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहिलेल्यानंतर दोघांत वाद झाले.

12 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, महिलेला नात संपवायचं होतं, नाराज पार्टनरने भरदिवसा केली हत्या
केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचे समोर आले आहे. 12 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहिलेल्यानंतर दोघांत वाद झाले. वादानंतर महिलेने वेगळे राहण्याचे ठरवले, या रागात त्या व्यक्तीने महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना केरळमधील त्रिवेंद्रम येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येमागील कारण परस्पर वैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. त्यामुळे ही महिला काही काळ आरोपीपासून वेगळी राहत होती. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुण ओडिशातून सुरतला घेऊन आला अन् नंतर जे झालं ते भयंकर....
यानंतर काही दिवसांनी दोघांनी वाद मिटवण्यासाठी भेटायचे ठरवले. यादरम्यान, आरोपीने सिंधूचा रस्त्याच्या मधोमध चाकूने वार करून हत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पूर्ण नियोजन करून ही हत्या केली. त्याने सोबत शस्त्र आणले होते.
हल्ल्यानंतर महिला रस्त्यावर पडली. दरम्यान, तेथून जात असलेल्या नागरिकांनी महिलेला पाहिले. जवळच असलेल्या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने महिलेवर चाकूने सुमारे 10 वार केले आहेत. ती महिला संबंध संपवण्याच्या विचारात होती, त्यामुळेच आरोपीने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला असल्याची माहिती समोर आली.