शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

नात्याला काळीमा! 'बाबांनीच आईला खूप मारलं'; 3 वर्षांच्या चिमुकल्याने सांगितलं नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 11:20 AM

Crime News : महिलेच्या हत्येचा तपास पोलीस करत असताना तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईसोबत काय घडलं, याची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोळ्यासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानेच नेमक काय घडलं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका महिलेच्या हत्येचा तपास पोलीस करत असताना या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईसोबत काय घडलं, याची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं. 

तीन वर्षांच्या छोट्या मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हत्येचा सुगावा लावला आहे. तपासादरम्यान, हत्या झालेल्या महिलेच्या मुलाशी पोलीस बोलले तेव्हा त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. आपल्या वडिलांनीच आईला मारल्याचं म्हटलं आहे. जेवण चांगलं का बनवत नाहीस, असं विचारत वडील आपल्या आईला काठीने मारत होते. खूप वेळ वडिलांनी आईला काठीने बेदम मारहाण केल्यामुळे आई खाली पडली. आईला डॉक्टरकडे देखील नेलं नाही अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली. 

तीन वर्षांच्या चिमुकल्यामुळे लागला हत्येचा सुगावा

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमध्ये यशोदा आणि विनोद लोहा हे दांपत्य राहत होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत होती. पतीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही यशोदाने आपल्या घरच्यांना दिली होती. सतत जीवे मारण्याची धमकी देणं, मारहाण करणं असे प्रकार होत होते. नीट स्वयंपाक करत नसल्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर पतीने यशोदाला बेदम मारहाण केली. पाईप आणि काठीने बेदम मारहाण करताना यशोदाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हृदयद्रावक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपा सक्सेना असं या महिलेचं नाव असून तिचे पती सुदेश सक्सेना यांचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर दीपा अत्यंत दु:खी झाली होती. सकाळी खूप वेळ झाला तरी दीपा आपल्या खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दीपा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी लगेचच पोलिसांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस