Crime News: ...म्हणून त्यांनी प्रवासी बनून १२ तासांत केली २ कॅबचालकांची हत्या, असं घडवलं भयावह हत्याकांड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 22:56 IST2022-01-08T22:55:36+5:302022-01-08T22:56:05+5:30

Crime News: राजधानी दिल्लीमध्ये दोन कॅबचालकांची हत्या करून त्यांच्याकडी सामान चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षांच्या दोन तरुणांना अटक केली आहे.

Crime News: ... So he became a passenger and killed 2 cab drivers in 12 hours. | Crime News: ...म्हणून त्यांनी प्रवासी बनून १२ तासांत केली २ कॅबचालकांची हत्या, असं घडवलं भयावह हत्याकांड 

Crime News: ...म्हणून त्यांनी प्रवासी बनून १२ तासांत केली २ कॅबचालकांची हत्या, असं घडवलं भयावह हत्याकांड 

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये दोन कॅबचालकांची हत्या करून त्यांच्याकडी सामान चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षांच्या दोन तरुणांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त (मध्य), श्वेता चौहान यांनी सांगितले की, आरोपींची ओळख आनंद परिसरातील आकाश ऊर्फ अक्कू  आणि जुनैद अशी पटली आहे. चौहान यांनी सांगितले की, आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी ऑनलाईन माध्यमातून कॅब बुक करण्याचे आणि नंतर चालकांना लुटण्याचे कारस्थान रचले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री एक वाजता आरोपींनी कमल टी-पॉईंट येथून एक कॅब बुक केली आणि काही अंतरावर जाऊन मागून चालकाचा गळा दाबूत त्याची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोबाईल फोन काढून घेतला, तसेच मृतदेह आणि कार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांची विल्हेवाट लावली.

डीसीपींनी सांगितले की, त्यानंतर दोघांनीही सकाळी पावणेसात वाजता आनंद पर्वत येथून एक कार बुक केली आणि लूट वर हत्येसाठी तीच पद्धत अवलंबली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी कॅब चालकाचा मृतदेह आणि कार रामजस ग्राऊंडजवळ फेकली आणि पाकीट आणि फोन घेऊन फरार झाले.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता कार आढळून आली. तसेच त्याच्यामध्ये चालकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, व्यक्तीला आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृताची ओळख ही महावीर एन्क्लेव्ह येथील अनिल यादव अशी पटली आहे. त्यांचा मोबाईल आणि पाकीट गायब होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसरा कॅब चालक, असलेल्या नोएडामधील छविनाथ यांचा मृतदेह उत्तर पश्चिम दिल्लीतील भरतनगर परिसरात सापडले. त्यांची कार गुलाबी बाग येथे सापडली. चौहान यांनी सांगितले की, तांत्रिक सर्व्हिलान्सच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली आहे.  

Web Title: Crime News: ... So he became a passenger and killed 2 cab drivers in 12 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.