Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:52 IST2025-05-05T11:48:57+5:302025-05-05T11:52:12+5:30
Crime: एका घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. दुकानदार ग्राहकासोबत व्यवहार करत असताना एक व्यक्ती येतो आणि छातीत गोळी मारून निघून जातो. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच दुकानदाराचा मृत्यू होतो.

Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Marathi Crime news: गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही, असा प्रश्न पडावा इतकी गुन्हेगारी वाढली आहे. कुठेही कुणाचीही हत्या करतानाच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एका दुकानदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात. हत्या करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव संजीव कुमार ऊर्फ गुड्डू कुमार ऊर्फ गौरीशंकर गुप्ता असे आहे. नगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
दोघे आले, पंखा दाखवा म्हणाले अन्...
पोलिसांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे दुचाकीवरून आले होते. दोघांचा चेहरा झाकलेला होता. ते दुकानात आले आणि म्हणाले की, पंखा दाखवा. याचवेळी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीने संजीव कुमार यांच्या छातीत गोळी झाडली.
व्हिडीओमध्ये काय?
संजीव कुमार हे दुकानात त्यांच्या खुर्चीवर बसले आहेत. ते ग्राहकाशी बोलत असताना तोंड झाकलेला एक व्यक्ती अचानक पिस्तूल काढतो आणि त्यांच्या दिशेने गोळी झाडतो. गोळी त्यांच्या छातीत लागते. त्यानंतर संजीव कुमार हे गोळी लागलेल्या ठिकाणी हाताने दाबून धरतात आणि खुर्चीवरून उठतात. ते चालत दुकानाच्या दरवाजाजवळ येतात आणि कोसळतात.
साहिबगंज जिले में दुकानदार की गो'ली मा'रकर ह'त्या, CCTV में कैद वारदात#jharkhandsahibganjnews#sahibganjnews#crimenews#shopkeepershotdead#jharkhandlatestnewspic.twitter.com/BcPAaIm70f
— Johar Live (@joharliveonweb) May 5, 2025
गोळीचा आवाज ऐकल्यानंतर लोक दुकानात आले. तेव्हा दुकानदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी संजीव कुमार यांना तातडीने रुग्णालयात नेले. पण, उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. नातेवाईकांनी सांगितले की, संजीव कुमार हे रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक होते आणि निवृत्त झाले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अमित कुमार सिंह आणि ठाण्याचे प्रमुख दुकानात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.