Crime News: सेक्स रॅकेट: पोलिसांनी सापळा रचला, कॉल गर्ल, एजंट त्यांचे पैसे घेऊन फरार...; घटनाच अशी की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 09:22 IST2023-01-09T09:21:29+5:302023-01-09T09:22:23+5:30

शुक्रवारी रात्री हा सापळा रचण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे एजंट कारमधून कॉल गर्लला घेऊन तिथे आला. पोलिसांनी त्याला ग्राहक बनून फोन केला होता.

Crime News: Sex racket: Hariyana Gurugram Police lay a trap, call girl absconds with their money...; The event is that... | Crime News: सेक्स रॅकेट: पोलिसांनी सापळा रचला, कॉल गर्ल, एजंट त्यांचे पैसे घेऊन फरार...; घटनाच अशी की...

Crime News: सेक्स रॅकेट: पोलिसांनी सापळा रचला, कॉल गर्ल, एजंट त्यांचे पैसे घेऊन फरार...; घटनाच अशी की...

देहविक्रयचा धंदा आता हायटेक झाला आहे. पोलिसांना चकमा देण्यासाठी या अवैध धंद्यातील लोक नवनवीन युक्त्या लढवत असतात. कधी कधी पोलीस सापळा रचून, नकली गिऱ्हाईक पाठवून ही सेक्स रॅकेट उध्वस्त करत असतात. परंतू, गुरुग्राममध्ये सेक्स रॅकेट पकडण्यासाठी सापळा रचलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कॉल गर्ल आणि एजंट पसार झाले आहेत. 

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये कॉल गर्ल आणि दलालाने पोलिसांनाच चुना लावला आहे. व्हॉट्सअॅपरवर फोटो पाठवून हे सेक्स रॅकेट चालविले जात होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सेक्टर ५६ मध्ये सापळा रचला होता. नकली गिऱ्हाईक म्हणून पोलिसालाच पाठविले होते. तर साध्या वेशातील पोलीस खासगी गाड्यांमधून आसपासच दबा धरून बसले होते. घटना अशी घडलीय की पोलिसांचे हसू झाले आहे. 

शुक्रवारी रात्री हा सापळा रचण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे एजंट कारमधून कॉल गर्लला घेऊन तिथे आला. पोलिसांनी त्याला ग्राहक बनून फोन केला होता. एजंटने जागा आणि रेट ठरविला होता. दोन मुलींचे फोटो पाहून त्यांना पोलिसांनी सिलेक्ट केले होते. यासाठी एका रात्रीचे २०००० रुपये ठरले होते. या दोन्ही कॉल गर्लना घेऊन एजंट आला. पोलीसांच्या डमीने त्यांची कार गाठली आणि मागच्या सीटवर त्याच दोन तरुणी असल्याची खात्री केली. तसेच कारमध्ये एक चालक आणि आणखी एक तरुण बसला होता. 

डमी पोलीस शिपाई खुशीरामने एजंटकडे ५००-५०० रुपयांच्या नोटा दिल्या आणि पोलीस टीमला इशारा केला. हे त्या एजंटच्या लक्षात आले आणि खुशीराम ते पैसे परत घेत होता, ते त्याच्या हातातून हिसकाऊन घेत त्याच्यावर हल्ला केला. यानंतर त्यांनी कार पळविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांची कार पोलिसांच्या खासगी कारला आदळली. परंतू ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. 

पोलिसांनी या कारचा पाठलाग केला, परंतू दाट धुके असल्याने पुढे ती कार पोलिसांना दिसलीच नाही. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 

 

Web Title: Crime News: Sex racket: Hariyana Gurugram Police lay a trap, call girl absconds with their money...; The event is that...