Crime News: भयानक! पत्नीचे वारंवार होणारे गर्भपात थांबविण्यासाठी 8 वर्षांच्या मुलीचा दिला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:48 IST2021-08-09T19:47:48+5:302021-08-09T19:48:38+5:30
Crime News: काही दिवसांपूर्वी लहान मुलीचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडला. सुरुवातीच्या तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र, पोस्टमार्टेममध्ये बलात्कार झाला नसल्याचे समोर आले.

Crime News: भयानक! पत्नीचे वारंवार होणारे गर्भपात थांबविण्यासाठी 8 वर्षांच्या मुलीचा दिला बळी
बळी देण्यासाठी एका आठ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याची भयावह घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहार पोलिसांनी आज या अघोरी कृत्याच्या पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी लहान मुलीचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडला. सुरुवातीच्या तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र, पोस्टमार्टेममध्ये बलात्कार झाला नसल्याचे समोर आले. मुंगेरचे पोलीस अधिक्षक जेजे रेड्डी यांनी सांगितले की, आरोपी दिलीप कुमार पदम गावात राहतो. त्याच्या पत्नीचा वारंवार गर्भपात होत होता. त्याला एका मांत्रिकाने परवेज आलम सांगितले की, पत्नीचा गर्भपात रोखण्यासाठी एका मुलीचा बळी द्यावा लागेल.
दिलीप कुमारने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी अनेक वर्षांनी मुलाला जन्म देणार होती. आलमच्या जादुई शक्तींमुळे हे शक्य झाल्याचा त्याने दावा केला. तांत्रिकाने सांगितलेले की, गर्भवतीने एका किशोरवयीन मुलीच्या रक्ताने आणि डोळ्यांनी बनलेला दोरा गळ्यात घालण्याची गरज आहे. दिलीपला त्याच्याच गावातील तन्वीर आलमने या मांत्रिकाकडे नेले होते.
मांत्रिकाचे ऐकून दोघांनी जवळच्याच गावातील फरदामध्ये राहणाऱ्या दशरथचे घर गाठले. दशरथने सांगितले की, त्य़ाच्या पोल्ट्री फार्ममध्ये बळी देण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. यानंतर हेरून त्यांनी एका मुलीला उचलले. ती तिच्या मच्छीमार वडिलांना नदीवर जेवन देऊन घरी परतत होती. यानंतर त्यांनी तिचा बळी दिला आणि तांत्रिकाला भेटले. त्या तांत्रिकाने त्याचा ताबीज बनविला आणि दिलीपच्या पत्नीच्या गळ्यात बांधण्यास सांगितला. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे.