शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"; तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 09:18 IST

Crime News : सोशल मीडियावरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. "10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन" अशी धमकी मिळाली आहे.

नवी दिल्ली - झारखंडच्या रांचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. "10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन" अशी धमकी मिळाली आहे. एका तरुणीने पोलिसांत अश्लील फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात एक तरुण 10 लाख रुपये मागून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. तरुणीने आपल्या तक्रारीत सोशल मीडियावर मैत्री झालेल्या तरुणाने तरुणीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअप ग्रुपवरून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

 फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील, तर 10 लाख रुपये देण्याची मागणीही तरूणाने केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांचीमधील 24 वर्षीय तरुणीची शफीक अन्सारी नावाच्या तरुणाशी सोशल मीडियावर ओळख झाली. हळूहळू ही ओळख मैत्रीत परिवर्तीत झाली आणि त्या दोघांनी प्रत्यक्ष भेटायला सुरुवात केली. भेटीच्या वेळी ते दोघंही एकमेकांना आपला फोन देत असत आणि त्याचा गैरफायदा घेत तरुणीच्या मोबाईलमधले तिचे काही फोटो आणि व्हिडिओ तरुणाने स्वतःकडे घेतले. फोटो मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

जीवे मारण्याची आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी

फोटोशॉपचा वापर करून आपले मूळ फोटो बदलून अश्लील फोटो आणि व्हिडीओ या तरुणाने तयार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. शफीकने तरुणीची ओळख असणाऱ्या काही ग्रुपमध्ये हे फोटो टाकायला सुरुवात केली. त्या ग्रुपमधील ओळखीच्या सदस्यांकडून जेव्हा तरुणीला ही गोष्ट समजली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने फोन करून शफीकला याचा जाब विचारला. मात्र त्याने तिला थेट जीवे मारण्याची आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या फोटोंच्या बदल्यात 10 लाख रुपये देण्याची मागणी देखील  तरुणीकडे केली. 

"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"

शफीकने मैत्री करताना तो विवाहित नसल्याचं सांगितलं होतं. मात्र नंतर तरुणीला तो विवाहित असल्याचं समजलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. 10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. लवकरच तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई  केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतJharkhandझारखंडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया