भयंकर! "मी हिच्यासाठी मरत आहे"; Whatsapp स्टेटसवर प्रेयसीचा फोटो ठेवून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 12:46 IST2022-04-26T12:43:35+5:302022-04-26T12:46:05+5:30

एका तरुणाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. प्रियकराने मृत्यूपूर्वी प्रेयसीचा फोटो Whatsapp स्टेटसवर अपलोड केला होता.

Crime News rajasthan 19 year old boy used his girl friend photo as whats app status then committed suicide | भयंकर! "मी हिच्यासाठी मरत आहे"; Whatsapp स्टेटसवर प्रेयसीचा फोटो ठेवून तरुणाची आत्महत्या

भयंकर! "मी हिच्यासाठी मरत आहे"; Whatsapp स्टेटसवर प्रेयसीचा फोटो ठेवून तरुणाची आत्महत्या

नवी दिल्ली - प्रेमाचे अनेक हटके किस्से हे सतत समोर येत असतात. काही लोक समोरच्या व्यक्तीने नकार दिला किंवा प्रेमात अपयश आलं तर टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राजस्थानमध्ये एक लव्हस्टोरीचा भयंकर अंत झाला आहे. एका तरुणाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. प्रियकराने मृत्यूपूर्वी प्रेयसीचा फोटो Whatsapp स्टेटसवर अपलोड केला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका 19 वर्षीय मुलाने आपल्या प्रेयसीवर नाराज होऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी त्याने Whatsapp स्टेटसवर प्रेयसीचा फोटो अपलोड केला होता. "मी हिच्यासाठी मरत आहे" असं म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळानंतर प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

जीवराजगडमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय अर्जुनने रात्री उशिरा घराजवळील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनने मृत्यूपूर्वी प्रेयसीचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, मी हिच्यासाठी आत्महत्या करीत आहे. मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारावर तपास सुरू आहे. ज्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News rajasthan 19 year old boy used his girl friend photo as whats app status then committed suicide