शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News in Pune: साताऱ्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या आईचा पुण्यात खून; डोक्यात रॉड मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 09:45 IST

Murder in Pune: विठ्ठल शेलार हे सातारा पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुण्याच्या भाजी मंडईजवळच त्यांच्या आईचे भंगार विक्रीचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या.

पुणे : सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या विठ्ठल शेलार यांच्या आईच्या डोक्यात रॉड मारुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ ही पहाटे घटना घडली आहे. (Murder in Pune, warje Malwadi.)

शाबाई शेलार यांचा मुलगा विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भाजी मंडईजवळच त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे.गेल्या काही दिवसात लॉकडाऊनच्या काळातच खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या ४ दिवसात संचारबंदी असतानाही खुनाच्या ५ घटना घडल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस