Crime News: पोलिसाला मारहाण, ४ जवान अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 03:06 IST2022-09-02T03:06:14+5:302022-09-02T03:06:35+5:30

Crime News: पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भारतीय नौदल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना कफ परेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Crime News: Police assaulted, 4 jawans arrested | Crime News: पोलिसाला मारहाण, ४ जवान अटकेत  

Crime News: पोलिसाला मारहाण, ४ जवान अटकेत  

मुंबई : पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भारतीय नौदल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना कफ परेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 
       चारही आरोपी कफ परेडमध्ये फिरण्यासाठी आले होते. आरोपींनी रविवारी दुपारचे जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली. टॅक्सीने काही अंतर गेल्यानंतर एका आरोपीने टॅक्सीतच सिगारेट पेटवली. त्यास टॅक्सी चालकाने विरोध केला. मात्र, आरोपींनी टॅक्सी चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सिगारेटच्या मुद्यावरून टॅक्सी चालक आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या घटनेची माहिती मिळताच एक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाद मिटवण्यासाठी  प्रयत्न करू लागले. मात्र आरोपींनी उलट पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर नौदल अधिकारी अभिजित कुमार सिंग (३०) व आर. एस. दुबे आणि सीआयएसएफचे अधिकारी चंद्रभान सिंग (२६), प्रवीण अशोक सिंग (२७) यांना अटक करण्यात आली.

Web Title: Crime News: Police assaulted, 4 jawans arrested