शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! बलात्कार पीडितेला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत दोरखंडाने बांधून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 13:04 IST

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे तरुणीला बेदम मारहाण करून तिची बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत धिंड काढण्यात आली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. एका बलात्कार पीडित तरुणीला मदत करण्याऐवजी तिच्याच नातेवाईकांनी तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीला बेदम मारहाण करून तिची बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत धिंड काढण्यात आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. पोलिसांनी याची दखल घेतली असून आरोपी आणि पीडित युवतीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. एका कुटुंबाने बलात्कार पीडित मुलीला आधार देण्याऐवजी बेदम मारहाण केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आणि पीडितेला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली आहे. तसेच पीडित मुलीची आरोपीसोबत धिंड देखील काढली आहे. संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचा असून तिच्या नात्यातील आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी आणि नातेवाईकांविरोधात तक्रार केली आहे. बलात्काराच्या घटनेची घरी माहिती देताच त्यांनी बेदम मारहण केल्याचं तिने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी विजय भागवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा विवाहित असून पीडित मुलगी आरोपीला आधीपासून ओळखत होती. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला आणि पीडित मुलीला पकडून त्यांना बेदम मारहाण केली आहे. पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! 62 वर्षीय महिलेवर बलात्कार, केली बेदम मारहाण; जीवे मारण्यासाठी अंगावर घातली बाईक

 मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला जीवे मारण्यासाठी अंगावर बाईक देखील घातली आहे. यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. महिलेला उपचारासाठी ग्वाल्हेरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

गिरवाई परिसरात एका 62 वर्षीय महिलेवर मिठाई विक्रेत्याने आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केला आहे. एका कार्यक्रमात कामासाठी तिला बोलावण्यात आले होते. त्यानंतर महिलेला जंगल परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिला जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. आपागंज येथील कल्लू उर्फ दिलीप नावाच्या मिठाई विक्रेत्याला एका कार्यक्रमात जेवण तयार करण्याचे काम मिळाले. त्यासाठी एका महिलेचीही गरज होती. त्याने पीडित महिलेला बोलावले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक