शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Crime News: ठाण्यात ऑपरेशन ऑल आउट, २३९ आरोपींना ठोकल्या बेड्या ठाणे पोलीस आयुक्तालयात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:29 IST

Crime News: ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून राबविलेल्या ‘ऑपरेशन ऑल आउट’अंतर्गत अवैध शस्त्र बाळगणे, दारूबंदीचे उल्लंघन, जुगार प्रतिबंध कारवाई, अमली पदार्थ बाळगणे, फरार आरोपी आणि स्टॅंडिंग वॉरंट बजावून अटक आदी १६१ गुन्ह्यातील तब्बल २३९ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

ठाणे  : ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून राबविलेल्या ‘ऑपरेशन ऑल आउट’अंतर्गत अवैध शस्त्र बाळगणे, दारूबंदीचे उल्लंघन, जुगार प्रतिबंध कारवाई, अमली पदार्थ बाळगणे, फरार आरोपी आणि स्टॅंडिंग वॉरंट बजावून अटक आदी १६१ गुन्ह्यातील तब्बल २३९ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.  गुन्हेगारीला आळा बसण्याकरिता ऑल आउट ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली होती. २८ जानेवारी रात्री २ ते शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथ भागात मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात १५ केस करण्यात आल्या आहेत, वॉरंट बजावून एकूण सात आरोपी, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणारे दहा आरोपी मिळून आले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करून अटक करण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याचे यावेळी सांगण्यात आले. कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. 

विविध गुन्ह्यातील आरोपींचा समावेश१६१ गुन्ह्यातील तब्बल २३९ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. xnमुंबई जुगार अधिनियमान्वये एक गुन्हा दाखल करून तीन आरोपींवर कारवाई केली. nदारूबंदी कायद्यान्वये दोन आरोपींना अटक केली. nउल्हासनगर व मुरबाड पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी अनुक्रमे गुरुसिंग लभाना (३८)  व विजय सपकाळे (२२) यांना संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपविले. nदारूबंदी प्रतिबंधक अधिनियम अन्वये ७२ गुन्हे  

हद्दपार आरोपींना घेतले ताब्यातहद्दपार केलेल्या कल्याणी भीमराव खांडेकर (वय ३९), अब्दुला उर्फ सोनू उथप्पा उर्फ बकरी पहलवान (३०), मोहम्मद हारुण फारूख कुरेशी (३५) यांना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. तसेच पोलिसांना पाहिजे असलेल्या पाच आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपविले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये दोन आरोपींनाही संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. 

ठाणे शहर वाहतूक शाखा  यांनी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १२९२ मोटार चालकांविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ८९, गणवेष परिधान न केलेले ऑटोरिक्षाचालक  ११९ तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या १०९२ जणांचा समावेश आहे. 

३३० पोलीस अधिकारी सहभागी- मोहिमेमध्ये ३३० पोलीस अधिकारी व १६९८ पोलीस अंमलदारांचा सहभाग होता. -९५ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये १३ गुन्हे -३२ आरोपींवर एनडीपीएस ॲक्ट अन्वये ४८ गुन्हे दाखल करत केली अटक -फरार, रेकॉर्ड, पॅरोलवरील ३२ फरारी आरोपींना केली अटक  

कारचालकाने पोलिसाला उडवले पालघर : ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेदरम्यान मनोरवरून माहीमच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एका कारचा चालक जयदीप पाटील (२९) याला थांबण्याच्या सूचना देऊनही तो न थांबता त्याने कर्तव्यावर असलेल्या मधुकर काकोलथे या पोलिसाला उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या प्रकरणात पोलीस गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.पोलीस सूत्रांनुसार, संपूर्ण पालघर जिल्ह्यात २८-२९ जानेवारी या दोन दिवसांसाठी १६ पोलीस ठाण्यांत ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबविण्यात आली. पालघरमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका कॉन्स्टेबलला एका कारने उडविल्याची घटना घडली. पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबल काकोलथे यांनी मनोर रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला थांबविण्याच्या सूचना दिल्या, मात्र त्या चालकाने आपली गाडी भरधाव चालवून उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला जोरदार धडक देत उडवले. यावेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ जखमी कॉन्स्टेबलला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याआधीही पोलिसांवर हल्ले, अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस