रात्री पतीसोबत जेवली मग फोनवर बोलली अन्...; प्यारवाली लव्हस्टोरीचा 'असा' धक्कादायक शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 14:28 IST2023-01-08T14:27:05+5:302023-01-08T14:28:00+5:30

एका विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे.

Crime News newly married woman ends life in jhansi uttar pradesh | रात्री पतीसोबत जेवली मग फोनवर बोलली अन्...; प्यारवाली लव्हस्टोरीचा 'असा' धक्कादायक शेवट

रात्री पतीसोबत जेवली मग फोनवर बोलली अन्...; प्यारवाली लव्हस्टोरीचा 'असा' धक्कादायक शेवट

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने अतिशय टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या झांसी येथील मऊरानीपुर परिसरात ही घटना घडली. विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोतवाली पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासानंतर कारवाई सुरू केली.

धक्कादायक घटनेबाबत विवेक रायकवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री पत्नीसोबत जेवण करून ते कामावर गेले होते. रात्री बोलणं झाल्यानंतर पत्नी झोपण्यासाठी गेली होती, असं पतीनं सांगितलं. मात्र सकाळी कुटुंबीयांना ती फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर धक्काच बसला. महिलेने दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मृत महिलेच्या पतीने सांगितलं की "जवळपास दीड वर्षापूर्वी त्याने मुस्कानसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. या लग्नासाठी मुस्कानच्या घरचे तयार नव्हते. मात्र तरी घरच्यांच्या विरोधात जात तिने सगळं सोडून माझ्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर सगळं व्यवस्थित सुरू होतं. अशात पत्नीनं इतकं मोठं पाऊल का उचललं हेच समजलं नाही."

सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी घटनेबाबत सांगितलं की, तपास सुरू असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाकडूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News newly married woman ends life in jhansi uttar pradesh