Crime News : रेल्वेच्या तिकिटामुळे हत्येचा उलगडा, पोलिसांनी असा लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:55 IST2022-02-05T11:54:35+5:302022-02-05T11:55:07+5:30

Crime News :दारूसाठी पैशांची मागणी केल्याने प्रेयसीच्या मदतीने तरुणाचा काटा काढल्याचे माहीम हत्या प्रकरणात उघडकीस आले आहे. यात जखमी झालेल्या महिलेने प्रियकराच्या हत्येनंतर, स्वत:वर वार करीत हत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव केल्याचेही तपासात समोर आले आहे.

Crime News: Murder solved due to train ticket, police say | Crime News : रेल्वेच्या तिकिटामुळे हत्येचा उलगडा, पोलिसांनी असा लावला छडा

Crime News : रेल्वेच्या तिकिटामुळे हत्येचा उलगडा, पोलिसांनी असा लावला छडा

 मुंबई : दारूसाठी पैशांची मागणी केल्याने प्रेयसीच्या मदतीने तरुणाचा काटा काढल्याचे माहीम हत्या प्रकरणात उघडकीस आले आहे. यात जखमी झालेल्या महिलेने प्रियकराच्या हत्येनंतर, स्वत:वर वार करीत हत्येचा प्रयत्न केल्याचा बनाव केल्याचेही तपासात समोर आले आहे. तरुणाच्या खिशात सापडलेल्या रेल्वे तिकिटामुळे तपासाला दिशा मिळाली आणि रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत.
प्रियकरच्या सांगण्यावरून माहीम किल्ल्याजवळ येताच तेथे बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी प्रियकराची हत्या करीत हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती गुरुवारी तरुणीकड़ून मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रेयसीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. प्रेयसीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Crime News: Murder solved due to train ticket, police say