Crime news : घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या, आरोपीला पोलिसांकडून बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 13:24 IST2021-10-10T13:23:03+5:302021-10-10T13:24:08+5:30
Crime news : हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला.

Crime news : घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या, आरोपीला पोलिसांकडून बेड्या
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एका व्यक्तीने पत्नी आणि सासूची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या हत्याप्रकरणात स्वत: आरोपीने पोलिसांनी फोन करुन माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी बाबा हा व्यक्ती आपल्या सासू-सासऱ्याकडेच राहात होता. त्यातूनच, वाद झाल्याने आरोपीने सासूसह पत्नीचीही हत्या केली.
हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला. आरोपीने गोळी झाडल्यामुळे दोन्ही महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी महिलांची ओळख पत्नी निधी आणि सासू वीरो अशी पटविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बाबाला अटक केली आहे. तसेच, आरोपीकडून पुढील अधिक तपास सुरू आहे.