Crime News: आईने पैसे देणे बंद केले, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने संतापून केली हत्या, तपास करणारे पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:11 IST2022-02-21T13:00:06+5:302022-02-21T13:11:47+5:30
crime News: एका मुलीने मित्रासोबत मिळून तिच्या ५५ वर्षीय आईची सर्जिकल ब्लेडने गळा कापून हत्या केली. त्यानंतर पोलिसांसमोर एक वेगळीच कहाणी रचली त्यामुळे तपासावेळी काहीकाळ पोलीसही चक्रावले. मात्र अखेरीस पोलिसांनी शिताफीने छडा लावून आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राला अटक केली.

Crime News: आईने पैसे देणे बंद केले, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने संतापून केली हत्या, तपास करणारे पोलीसही चक्रावले
नवी दिल्ली - दिल्लीतील आंबेडकरनगर परिसरामध्य क थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका मुलीने मित्रासोबत मिळून तिच्या ५५ वर्षीय आईची सर्जिकल ब्लेडने गळा कापून हत्या केली. त्यानंतर पोलिसांसमोर एक वेगळीच कहाणी रचली त्यामुळे तपासावेळी काहीकाळ पोलीसही चक्रावले. मात्र अखेरीस पोलिसांनी शिताफीने छडा लावून आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारी रोजी सूचना मिळाली होती की, एका महिलेची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना घराच्या पहिल्या मजल्यावर ५५ वर्षीय महिला सुधा रानी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाला ताब्यात घेऊन पोलिसांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पोलिसांनी दिल्ल्या माहितीनुसार हा मृतदेह पाहून महिलेला जास्त प्रतिकार करता आला नाही, असे दिसत होत. मृत महिलेच्या मुलीने सांगितले होते की, रात्री सुमारे ९ वाजून ३० मिनिटांनी दोघे जण घरी आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी आईच्या घरातील रोकड आणि दागदागिने लुटले आणि मारहाण करून ते फरार झाले. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तसा तपास केला. मात्र तिने पोलिसांची दशाभूल करण्यासाठी ही कहाणी रचली होती.
मृत महिलेची मुलगी देवयानी हिचा विवाह झाला होता. तिला चार वर्षांचा मुलगा आहे, मात्र ती पतीला सोडून शिबू नावाच्या एका तरुणासोबत राहू लागली होती. दरम्यान, तिने पोलिसांना सांगितले की, आईने पतीसोबत न राहिल्यास प्रॉपर्टीमधून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच तिने पैसे देणेही बंद केले होते. त्यामुळे मी लिव्ह इनमधील मित्र शिबू याचा मित्र कार्तिकसोबत आईला वाटेतून बाजूला करण्याचा कट आखला. त्यानुसार आईची हत्या केली असे या महलन सांगितले.