crime news minor girl raped 44 times in kerala | माणुसकीला काळीमा! 17 वर्षीय मुलीवर तब्बल 44 जणांनी केला बलात्कार; 24 आरोपी अद्याप मोकाट

माणुसकीला काळीमा! 17 वर्षीय मुलीवर तब्बल 44 जणांनी केला बलात्कार; 24 आरोपी अद्याप मोकाट

नवी दिल्ली - देशात बलात्काराच्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. एका 17 वर्षाच्या मुलीवर तब्बल 44 जणांनी बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊन्सिलींगदरम्यान मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा धक्कादायक खुलासा केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे यापैकी कित्येक आरोपी हे मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने निर्भया केंद्रावर काऊन्सिलिंगदरम्यान या भयंकर प्रकाराची माहिती दिली आहे. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील पल्लकडमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीच्या आरोपाखाली 44 पुरुषांविरोधात 32 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी आतापर्यंत फक्त 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 24 जणांचा शोध सुरू आहे. ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींपैकी अनेक जण न्यायालयीन अटकेत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

केरळमध्ये गेल्या काही दिवसात बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. NCRB च्या एका रिपोर्टनुसार 100 टक्के शिक्षित लोकसंख्या असलेलं राज्य बलात्काराच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रती लाख लोकसंख्येत 11.1 महिलांवर बलात्कार झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या भावाने विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला होता. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. संतापजनक बाब म्हणजे भावाच्या मित्रानेच या घटनेचा एक व्हिडीओ शूट केला. पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगू नये यासाठी तिला बलात्काराची व्हिडीओ क्लिप ऑनलाईन अपलोड करून व्हायरल केली जाईल अशी धमकी देण्यात आली होती. 

नात्याला काळीमा! मोठ्या भावानेच केला विवाहित बहिणीवर बलात्कार; Video व्हायरल करण्याची दिली धमकी

उत्तर प्रदेशमधील एका गावात भावाने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. नशेत असताना हा प्रकार घडल्याचं म्हटलं जातंह. 23 डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित महिलेचा घरी नसताना मोठा भाऊ तिच्या घरी आला. त्यावेळी तो नशेत होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला आणि महिलेला धमकी दिली. तक्रार केल्यास अथवा कोणालाही याबाबत सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल केल्याची धमकी दिली होती. पीडित महिलेने आपल्या घरी हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावर आई-वडिलांनीही तिला पोलिसात न जाण्यास सांगितलं. त्यासाठी तिच्यावर दबाव आणला. आरोपी वारंवार त्रास देत असल्याने महिलेने पोलिसांत धाव घेऊन तिच्यासोबत घडलेला हा भयंकर प्रकार सांगितला. 

Web Title: crime news minor girl raped 44 times in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.