"पप्पा, त्याला सोडू नका..."; महिला सैनिकाने केली गळफास घेऊन आत्महत्या; 'त्या' मेसेजने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:23 PM2021-10-20T20:23:59+5:302021-10-20T20:31:59+5:30

Crime News : सुट्टीसाठी घरी आलेल्या तरुणीने आपल्या खोलीत गळफास घेतला.

Crime News military personnel commits suicide after man viral obscene | "पप्पा, त्याला सोडू नका..."; महिला सैनिकाने केली गळफास घेऊन आत्महत्या; 'त्या' मेसेजने खळबळ

"पप्पा, त्याला सोडू नका..."; महिला सैनिकाने केली गळफास घेऊन आत्महत्या; 'त्या' मेसेजने खळबळ

Next

नवी दिल्ली - सुट्टीसाठी घरी आलेल्या एका महिला सैनिकाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिला सैनिक जम्मू काश्मीरमध्ये तैनात होती, दोन ऑक्टोबर रोजी ती गोवर्धन येथे आपल्या घरी सुट्टीसाठी काही दिवस आली होती. त्याचवेळी तिने आत्महत्या केली. त्याआधी आपल्या वडिलांना मेसेज केल्याने ही भयंकर घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरूणी दोन वर्षांपूर्वी सैन्यामध्ये भरती झाली. त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर जम्मू काश्मीरमध्ये तिचं पोस्टींग करण्यात आलं. पण सुट्टीसाठी घरी आलेल्या तरुणीने आपल्या खोलीत गळफास घेतला. मुलगी घरी आल्याच्या आनंदात कुटुंब होतं पण मुलीच्या आत्महत्येने आता त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. तरुणी रात्री झोपण्यासाठी खोलीत गेली. पण सकाळी खूप वेळ झाला तरी बाहेर येत नसल्याने तिच्या वडिलांनी तिला कॉल करण्यासाठी आपला मोबाईल हातात घेतला. 

"ऐकलं नाही तर कुटुंबीयांनी जीवे मारण्याची दिली धमकी"

वडिलांना त्यावेळी तरुणीने केलेला एक मेसेज दिसला. त्यामध्ये तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. तरुणीने आपल्या वडिलांना केलेल्या मेसेजमध्ये प्रवीण नावाचा एक तरुण आपल्याला मानसिक आणि शारीरीक त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याने मला नशा येणारे पदार्थ देऊन माझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ देखील काढले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. जर आपलं ऐकलं नाही तर कुटुंबीयांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचं मेसेजमध्ये म्हटलं आहे. 

"पप्पा, प्रवीणला सोडू नका, त्याला कधीच माफ करू नका"

"पप्पा, मी तुम्हाला हे सांगितलं नाही पण 31 तारखेला तो मला गोड बोलून, फसवून त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने चार दिवस त्याच्यासोबत मला ठेवलं आणि त्याच दरम्यान नशा आणणारे पदार्थ देऊन माझे अश्लील व्हिडीओ आणि काही फोटो काढले आहेत. पप्पा, प्रवीणला सोडू नका, त्याला कधीच माफ करू नका" असं देखील तरुणीने आपल्या मेसेजमध्ये लिहिलं आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Crime News military personnel commits suicide after man viral obscene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app