Crime News : मेहुण्याने केला भावोजीवर गोळीबार, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 00:09 IST2022-03-07T00:08:12+5:302022-03-07T00:09:19+5:30
Crime News: संतोष भवनच्या शर्मावाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागील आठ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा गोळीबाराची घटना झाल्याने वसई तालुक्यासह नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

Crime News : मेहुण्याने केला भावोजीवर गोळीबार, धक्कादायक कारण आलं समोर
नालासोपारा - संतोष भवनच्या शर्मावाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागील आठ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा गोळीबाराची घटना झाल्याने वसई तालुक्यासह नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. तर नेहमी होणाऱ्या घटनेमुळे पोलिसांच्या डोक्याला ताप झाला आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लव्ह मॅरेजच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचे कळते. अंदाजे २५ते ३० वयोगटातील हितेश जोशीवर त्याच्या पत्नीच्या भावाने रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत बारच्या थोडे पुढे दोन गोळ्या फायरिंग केल्या आहे. आरोपी हा दुचाकीवरून आला होता. जखमी हितेश जोशीला उपचारासाठी अलायन्स हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. तुळींज पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करत गुन्ह्याचा तपास करत आहे.