Crime News: मंदिरात लग्न केले, पहिली रात्र सोबत घालवली; नंतर मित्रांसोबत सामुहिक बलात्कार केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 09:41 IST2022-11-01T09:40:10+5:302022-11-01T09:41:00+5:30

हरियाणामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

Crime News: Married in a temple, spent the first night together; Later gang-raped with friends on girl in Hariyana | Crime News: मंदिरात लग्न केले, पहिली रात्र सोबत घालवली; नंतर मित्रांसोबत सामुहिक बलात्कार केला...

Crime News: मंदिरात लग्न केले, पहिली रात्र सोबत घालवली; नंतर मित्रांसोबत सामुहिक बलात्कार केला...

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे नाटक केले, कपाळावर कुंकू लावून तरुणीसोबत रात्र घालवून दुसऱ्या दिवशी तिला तिच्या घरी सोडले. यानंतर महिनाभराने आरोपी तरुणाने तिचे हात पाय बांधून मित्रांसोबत सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. हरियाणामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

पीडित तरुणीने याची तक्रार पोलिसांकडे करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर सामुहिक बलात्कार करताना तिच्या तोंडावर दारू आणि मिरची देखील फेकण्यात आली होती. तिच्या शेजारी एक महिला राहत होती. या महिलेच्या घरी आरोपी ये-जा करायचा. या काळात आरोपी तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. 

लग्नाचे आमिष दाखवून तिला तो मंदिरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यासोबत लग्न देखील केले. यानंतर कलियर शरीफला नेले आणि लग्नाची पहिली रात्र असल्याचे सांगून एकत्र राहिला. दिवस उजाडताच तिला परत तिच्या घरी नेऊन सोडले. यानंतर महिनाभराने, २८ ऑक्टोबरला तो त्याच्या मित्रांसोबत तरुणीच्या घरी पोहोचला. घरात कोणीच नसल्याने तिचे हातपाय बांधले आणि सामुहिक बलात्कार केला, असा तरुणीने आरोप केला आहे. 

यानंतर आरोपींना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेले. यानंतर पीडिता पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी नितीन आणि रावत यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. 
 

Web Title: Crime News: Married in a temple, spent the first night together; Later gang-raped with friends on girl in Hariyana