भयंकर! 18 वर्षांचा मुलगा 48 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला अन् तिच्याच लेकीचा काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:33 IST2022-08-25T15:27:24+5:302022-08-25T15:33:43+5:30

Crime News : 18 वर्षांचा तरुण आणि 48 वर्षांची महिला यांच्यातील प्रेमसंबंधात एका मुलीला जीव गमवावा लागला आहे.

Crime News man murdered minor girl was having love affair with her mother | भयंकर! 18 वर्षांचा मुलगा 48 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला अन् तिच्याच लेकीचा काटा काढला

भयंकर! 18 वर्षांचा मुलगा 48 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला अन् तिच्याच लेकीचा काटा काढला

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. दिल्लीच्या टीकरी बॉर्डर भागात 18 वर्षांचा तरुण आणि 48 वर्षांची महिला यांच्यातील प्रेमसंबंधात एका मुलीला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिची आई आणि 18 वर्षीय आरोपी हरीश यांच्यातील मैत्री आवडत नव्हती. तिने अनेकदा याचा विरोधही केला होता. त्यामुळेच तरुणाने तिचा काटा काढला. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिच्या आईचं प्रेमप्रकरण माहीत होतं पण तिचा याला विरोध होता. त्यामुळेच संतापून आरोपी हरीशने मुलीला मारण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. समीर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साधारण 1 वाजता पोलिसांना एक कॉल आला. यामध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा चाकूने गळा कापल्याचं सांगण्यात आलं. तेथील काहींनी आरोपीला पकडून ठेवलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी हरीश आणि मृत मुलीच्या आईमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. हे तिघेही जण एकाच घरात राहत होते. शिवाय हरीश आणि महिला एकाच कंपनीत काम करीत होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: Crime News man murdered minor girl was having love affair with her mother