संतापजनक! शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज; विद्यार्थिनींनी शिकवला चांगलाच धडा; केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 15:10 IST2021-10-10T15:08:46+5:302021-10-10T15:10:59+5:30
Crime News : शिक्षकाने विद्यार्थिनींना पाठवलेले अश्लील मेसेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संतापजनक! शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज; विद्यार्थिनींनी शिकवला चांगलाच धडा; केलं असं काही...
नवी दिल्ली - राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षकाने शाळेच्या पासआऊट विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एनसीसी शिक्षक निखिल जोस याने इन्स्टाग्रामवरुन दारु पार्टीचे आमंत्रण देत त्यांना शाळेबाहेर भेटायला बोलावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाने 10 पेक्षा जास्त मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा दावा केला जात आहे. अखेर विद्यार्थिनींनी आरोपी शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे. एकत्र येऊन सोशल मीडियावर त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली आहे.
आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनींना पाठवलेले अश्लील मेसेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशोक नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेचे शिक्षक निखिल जोस याला विद्यार्थिनींच्या इन्स्टाग्राम आयडीवर अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल आयटी कायद्यांतर्गत आता अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांना आरोपी शिक्षकाच्या मोबाईलवरुन काही स्क्रीनशॉट्स देखील मिळाले आहेत.
शिक्षकाने मद्यपान करण्यासाठी हॉटेलमध्ये भेटण्याची दिली ऑफर
अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपी निखिल जोस हा NCC शिक्षक आहे. शाळेत ऑनलाईन वर्गांसाठी व्हॉट्सएप ग्रुप तयार करण्यात आले होते. मात्र आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनींच्या क्रमांकावर खासगी गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला विद्यार्थिनींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मग शिक्षकाने त्यांना मद्यपान करण्यासाठी हॉटेलमध्ये भेटण्याची ऑफर दिली.
शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू
शाळेच्या अनेक विद्यार्थिनींनाही त्याने रात्री 10 वाजताच्या सुमारास अश्लील मेसेज पाठवले. त्यांना होमवर्कच्या बहाण्याने शाळेबाहेर भेटायला बोलावले. शाळेतून पासआऊट झालेल्या विद्यार्थिनींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली. शाळेच्या विद्यार्थिनीने इन्स्टाग्रामवर 27 मिनिटे 31 सेकंदांचा व्हिडिओही अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की शिक्षक निखिल जोसने अनेक मुलींशी अश्लील कृत्ये केली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.