Crime News: देवीला प्रसन्न करण्यासाठी पित्याने दिला पोटच्या पोरीचा बळी, जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:26 IST2022-05-10T16:25:41+5:302022-05-10T16:26:22+5:30
Crime News: बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये अत्यंत भयंकर घटना घडली आहे. एका सणकी पित्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News: देवीला प्रसन्न करण्यासाठी पित्याने दिला पोटच्या पोरीचा बळी, जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, तर्कवितर्कांना उधाण
पाटणा - बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये अत्यंत भयंकर घटना घडली आहे. एका सणकी पित्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह जाळला. अंधश्रद्धेतून घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येच्या या घटनेची वार्ता जंगलातील आगीप्रमाणे संपूर्ण परिसरात पसरली आहे. तसेच लोकांकडून उलटसुलट चर्चा होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार घरात सापडलेल्या रक्ताच्या डागांमुळे या व्यक्तीने केलेल्या कुकृत्यांचा पर्दाफाश खाला आहे. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याल आले. हा धक्कादायक प्रकार सीतामधीमधील कुशमारी पंचायतीच्या हद्दीतील उफरौलिया गावात घडला आहे. .येथे एका व्यक्तीने आपल्या १२ वर्षीय मुलीची हत्या केली. घरामध्ये रक्ताचे डाग सापडल्याने तसेच मुलगी बेपत्ता असल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी त्याला पकडले. तसेच त्याला बांधून पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
एका मुलीचा मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. स्थानिकांनी सांगितले की, आरोपी इंदल महतो हा मांत्रित-तांत्रिकांच्या नादी लागलेला होता. त्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी पोटच्या पोरीचा बळी दिला असावा, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आरोपीला तीन मुली होत्या. त्यातील मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. तर धाकटी मुलगी आईसोबत माहेरी राहते. तर मधली मुलगी पित्यासोबत एकटी राहायची.