Crime News: मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच..., ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 08:58 IST2022-09-03T08:57:55+5:302022-09-03T08:58:21+5:30

Crime News: आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर बालिकेवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे.

Crime News: I used to call you grandpa, but that's it..., 9-year-old girl sexually assaulted | Crime News: मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच..., ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Crime News: मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच..., ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर बालिकेवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे. मी त्यांना आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच अत्याचार करत होते. आईलाही सांगितले होते, हे सांगताना मुलीला अश्रू अनावर झाले. या घटनेने तिला मानसिक धक्का बसला असून पोलिसांकडून तिचे समुपदेशन सुरू आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

नाहूर परिसरात ९ वर्षीय नेहा (नावात बदल) आई आणि आजीसोबत राहायची. दोघीही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दिवा येथे राहणारा आरोपी आप्पा ऊर्फ अशोक वारुंगसे (६२), भांडुपमधील दिनेश ठक्कर (६५) यांच्याकडे सांभाळण्यासाठी देत होते. आरोपींची तिच्यावर वाईट नजर पडली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर त्यांनी अत्याचार सुरू केले. काही दिवसांपूर्वी नेहा आजीकडे पैसे मागताना दिसली. एका समाजसेवी संस्थेच्या सदस्यांचे नेहाच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. त्यांनी नेहाला ताब्यात घेत मानखुर्दच्या बालगृहात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेत चौकशी करताच तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराला वाचा फुटली.

आईने केले तक्रारीकडे दुर्लक्ष
२०२० पासून २० जूनपर्यंत नेहावर अत्याचार सुरू होते. याबाबत तिने आईलाही सांगितले होते. मात्र आईनेही तिच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी दुर्लक्ष केले. त्यामुळे नेहावर तीन विकृतांकडून अत्याचार सुरू होते. ही बाब समोर येताच छाया मलैया मुथा (४४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. तर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Crime News: I used to call you grandpa, but that's it..., 9-year-old girl sexually assaulted