शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Crime News: भल्या पहाटे पती गर्लफ्रेंडच्या घरी गेला; मागावर पत्नी आली, चप्पल बेडखाली दिसली अन् फसला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 15:53 IST

Husband Affair caught in Noida: दनकौर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हा तरुण राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याची गर्लफ्रेंड राहते. ही गर्लफ्रेंड एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता आहे.

नोएडाच्या दनकौरमध्ये विवाहित असूनही बाहेर लफडी करणाऱ्यांची झोप उडविणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्याल तिच्या घरी जाणे चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या मागोमाग पोहोचलेल्या पत्नीने त्याची चांगलीच धुलाई केली आहे.  महिलेने आपल्या पतीवर विवाहित असताना दसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध ठेवणे आणि मारहाण करण्याचा आरोप करत दनकौर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

दनकौर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हा तरुण राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याची गर्लफ्रेंड राहते. ही गर्लफ्रेंड एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता आहे. सोमवारी पहाटे ४ वाजता हा तरुण गुपचूप पत्नीला कळू न देता गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता. 

पत्नीला जेव्हा जाग आली तेव्हा पती घरी नसल्याचे तिच्या लक्षात आले. पतीचे लफडे तिच्या कानावर आले होते. यामुळे ती देखील गुपचूप पतीच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचली. पत्नी आल्याचे पाहून पती बेडच्या खाली लपला. मात्र, चप्पल लपवायला विसरला. बेडखाली त्याची चप्पल तशीच पडलेली होती. पत्नीने बेडखालून पतीला ओढून बाहेर काढले आणि धु धु धुतले. 

आरडाओरडा ऐकून आजुबाजुचे लोक जागे झाले. पहाटे पहाटे हा कसला गोंधळ ते पाहण्यासाठी ते जमा झाले. तर एक महिला एका पुरुषाला चोपत असल्याचे पाहिले. लोक येत असल्याचे पाहून पतीने तिच्या तावडीतून सुटत पलायन केले. महिलेसोबतचे लफडे पत्नीला माहिती आहे, अनेकदा तिने त्याबाबत आक्षेपही घेतला आहे. परंतू पती सुधरलेला नाही, असा आरोप तिने केला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश