"आता तुझं लग्न झालंय, जीन्स घालू नको"; पतीने रोखताच संतापली पत्नी, उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 17:45 IST2022-08-13T17:44:01+5:302022-08-13T17:45:03+5:30
Crime News : लग्नाला अवघे दोन महिने पूर्ण झाल्यावर पतीने जीन्स घालण्यावरून रोखलं. पुष्पा जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रेसाठी गेली होती

"आता तुझं लग्न झालंय, जीन्स घालू नको"; पतीने रोखताच संतापली पत्नी, उचललं टोकाचं पाऊल
नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जीन्समुळे धक्कादायक घटना घडली. "आता तुझं लग्न झालं आहे, जीन्स घालू नको" असं म्हणत पतीने रोखताच पत्नी संतापली आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात पतीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
झारखंड जिल्ह्यातील जमताडा परिसरात ही भयंकर घटना घडली. पुष्पा हेंब्रम या तरुणीचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नाला अवघे दोन महिने पूर्ण झाल्यावर पतीने जीन्स घालण्यावरून रोखलं. पुष्पा जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रेसाठी गेली होती. ती जेव्हा परत आली तेव्हा पतीने आता तुझं लग्न झालं आहे. त्यामुळे जीन्स घालून जत्रेला जाऊ नको असं सांगितलं.
पतीचं असं बोलणं ऐकताच पुष्पा संतापली आणि तिने पतीवर चाकून जोरदार वार केला. यामध्ये पती गंभीररित्या जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला. पुष्पाने देखील आपला गुन्हा कबुल केला आहे. सासरच्या मंडळींनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.