पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 23:06 IST2025-06-20T23:04:43+5:302025-06-20T23:06:48+5:30

आईला छतावरून फेकल्याचे पाहून मुलांनी तात्काळ आपल्या आजोबांना माहिती दिली. यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

Crime News husband or a beast? He first beat her for dowry, then threw wife out of the window | पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

काही दिवसांपूर्वी बरेली जिल्ह्यात पतीने आपल्या पत्नीला छतावरून फेकल्याची घटना घडली होती. तसाच एक धक्कादायक प्रकार आता उरईमधून समोर आला आहे. येथे एका पतीने हुंड्यासाठी क्रूरतेची परिसीमा गाठली. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने तो आपल्या पत्नीला छळू लागला. विशेष म्हणजे, संबंधित महिलेचे हे दुसरे लग्न होते आणि तिला पहिल्या पतीपासून मुलेही होती. एका दिवशी पतीने आधी मुलांना घरातून हाकलून दिले, त्यानंतर पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिला छतावरून खाली फेकून दिले.

आईला छतावरून फेकल्याचे पाहून मुलांनी तात्काळ आपल्या आजोबांना माहिती दिली. यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, महिलेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हुंड्यासाठी आमनाचा छळ
शहरानजिकच्या श्याम नगर मोहल्ल्यात राहणाऱ्या कमर सिद्दीकी यांनी उरई कोतवालीमध्ये तक्रार दाखल करत सांगितले की, त्यांची मुलगी आमना हिचा निकाह चार वर्षांपूर्वी आरिफसोबत झाला होता. आमनाचे हे दुसरे लग्न होते आणि तिला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत. निकाहपूर्वी, तिचा दुसरा पती आरिफ (रा. मोहल्ला टिळक नगर) याने मुलांची काळजी घेण्याचे वचन दिले होते. मात्र, लग्नानंतर त्याने दोन मुलांना घरातून बाहेर काढल. तसेच, तो आमनाला मारहाण करू लागला.

मुलांनी आईला पडताना पाहिलं अन्... 

१९ जून रोजी सायंकाळी पती आरिफ, त्याचा भाऊ इम्रान उर्फ ​​लालू, बहीण शहनाज आणि मुलगी निदा यांनी आमनाला मारहाण केली. त्यांनी तिचे सोन्याचे कानातलेही हिसकावून घेतले. यानंतर त्यांनी आमनाला छतावरून खाली फेकून दिले. ती खाली उभ्या असलेल्या मोटरसायकलवर पडली आणि गंभीर जखमी झाली. ही घटना पाहून आमनाच्या मुलाने धावत जाऊन आपल्या आजोबांना कळवले. वडिलांनी लगेच मुलीला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या आधारेही पोलीस पुरावे गोळा करत आहेत.

Web Title: Crime News husband or a beast? He first beat her for dowry, then threw wife out of the window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.