संतापजनक! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नीची गळा दाबून केली हत्या, वर्षभरापूर्वीच झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:34 IST2022-03-28T16:25:27+5:302022-03-28T16:34:40+5:30

Crime News : लग्नाच्या वर्षभरातच पती हैवान झाला असून त्याचं भयंकर रुप समोर आलं आहे. पैशाच्या हव्यासापोटी पतीनेच लग्नानंतर काही महिन्यांनी पत्नीचा काटा काढला आहे.

Crime News husband killed his wife in the greed of money in saharanpur uttar pradesh | संतापजनक! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नीची गळा दाबून केली हत्या, वर्षभरापूर्वीच झालेलं लग्न

संतापजनक! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नीची गळा दाबून केली हत्या, वर्षभरापूर्वीच झालेलं लग्न

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वर्षभरातच पती हैवान झाला असून त्याचं भयंकर रुप समोर आलं आहे. पैशाच्या हव्यासापोटी पतीनेच लग्नानंतर काही महिन्यांनी पत्नीचा काटा काढला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने पैशासाठी पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि तो फरार झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका नावाच्या तरुणीचं बिजनौरच्या धामपूरमध्ये राहणाऱ्या कृष्ण कुमारसोबत एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं. प्रियंका सध्या आपली बहीण उपासनाच्या घरी आली होती. उपासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाच्या सासरची मंडळी सातत्याने हुंड्याची मागणी करत होते. त्यामुळेच पती-पत्नीत नेहमीच वाद होत असत. याच कारणामुळे तिला पुन्हा सासरी जाण्याची इच्छा नव्हती. प्रियंकाचा नवरा तीन दिवसांपूर्वी तिला घरी परत घेऊन जाण्यासाठी आला होता. 

घरी आल्यावर कृष्ण कुमार आणि प्रियंकामध्ये वाद झाला. ज्यामध्ये त्याने तिचा गळा दाबला आणि चाकूने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जेव्हा घडली तेव्हा उपासना घरी नव्हती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी हत्येची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोलिसांना तिथे एक चाकू देखील सापडला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News husband killed his wife in the greed of money in saharanpur uttar pradesh