Crime News: पतीने ठेवले अनैसर्गिक संबंध, दिराने केला बलात्काराचा प्रयत्न, अखेर प्राण वाचवून पळाली महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 21:27 IST2022-01-18T21:26:28+5:302022-01-18T21:27:01+5:30
Crime News: भिलाई शहरामध्ये हुंड्याच्या लोभाने पतीनेच पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. एवढ्याने समाधान न झाल्याने त्याने पत्नीसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर तिच्या दिरानेही तिच्यावर वाईट नजर टाकली.

Crime News: पतीने ठेवले अनैसर्गिक संबंध, दिराने केला बलात्काराचा प्रयत्न, अखेर प्राण वाचवून पळाली महिला
रायपूर - छत्तीसगडमध्ये एका महिलेचा हुंड्यासाठी क्रूर छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच दिरानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या महिलेने आरोप केला की, तिच्या सासरची मंडळी हुंड्याची मागणी करत होती. ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे ते तिचा छळ करू लागले. त्यानंतर ही महिला कशीबशी बालाघाटला गेली आणि तिने तक्रार दाखल केली. त्यानंतर याबाबतची केस डायरी भिलाईच्या सुपेला पोलीस ठाण्यात पाठवली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भिलाई शहरामध्ये हुंड्याच्या लोभाने पतीनेच पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. एवढ्याने समाधान न झाल्याने त्याने पत्नीसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर तिच्या दिरानेही तिच्यावर वाईट नजर टाकली. कसाबसा आपला जीव वाचवत ही पीडिता बालाघाट येथे पोहोचली. त्यानंतर याबाबतची तक्रार बालाघाट पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भातील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी बालाघाट येथील पीडितेने तक्रार दाखल केी आहे. त्याअन्वये पोलिसांनी पीडितेचे पती क्षितिज, दीर निमिष कुमार, सासू आणि सासऱ्याविरोधात कलम ३५४, ४९८ए, २९४, ५०६ आणि ३४ अन्वये हुंडा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हे सर्वजण विवेकानंद कॉलनी जुनवानी येथील राहणारे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. लग्नानंतर तीन महिन्यांनी सासरच्या मंडळींकडून तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. पतीने व्यवसाय सुरू करण्यासाठी पत्नील माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता.