संतापजनक! नोकरी देण्याच्या नावाखाली पतीच्या मित्रांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 22:00 IST2022-04-18T21:59:01+5:302022-04-18T22:00:03+5:30
Crime News : सामूहिक बलात्कारानंतर तिच्या तीन अल्पवयीन मुलींचेही अपहरण करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संतापजनक! नोकरी देण्याच्या नावाखाली पतीच्या मित्रांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता घडली आहे. दिल्लीतील सीमापुरी भागात एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पतीच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेचा आरोप आहे की, सामूहिक बलात्कारानंतर तिच्या तीन अल्पवयीन मुलींचेही अपहरण करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पोलिसांबाबत देखील एक दावा केला आहे.
जेव्हा महिला या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा तिला तेथून हाकलून देण्यात आले. मात्र, हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, अपहरण आणि धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 15 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की 25 मार्चपासून ती यासाठी धडपड करत होती, मात्र 15 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेने दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ती पती आणि तीन मुलींसोबत गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथे राहत होती.
5 महिन्यांपूर्वी पतीसोबत वाद झाल्यानंतर ती दिल्लीतील लक्ष्मी नगर येथे मित्राच्या घरी मुलींसोबत राहू लागली. याच दररम्यान, तिच्या पतीचा आणखी एक मित्र सापडला आणि त्याने महिलेला गाझियाबादमधील शहीद नगरमध्ये भाड्याची खोली आणि नोकरी दोन्ही मिळवून देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी त्या व्यक्तीने महिलेला शहीद नगरमध्ये खोलीही मिळवून दिली. दरम्यान, 4 मार्च रोजी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली त्यांना जुन्या सीमापुरी येथे बोलावण्यात आले.
महिलेला एका खोलीत नेले, जिथे त्याच्यासोबत आणखी दोन लोक उपस्थित होते. त्या दिवशी तिघांनी खोलीला कुलूप लावून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओही बनवला, असा आरोप महिलेने केला आहे. तक्रार केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या तिघांनी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ती तिच्या तीन मुलींसह नरेला येथे राहू लागली, मात्र आरोपी तिला सतत फोन करून धमकावत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.