गर्लफ्रेंडसाठी कापलं पत्नीचं नाक, मग खिशात टाकून झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 09:43 IST2023-07-03T09:42:49+5:302023-07-03T09:43:26+5:30

Crime News : बांसताली गावात राहणाऱ्या विक्रमचं लग्न काही वर्षाआधी मोहम्मदाबाद गावात राहणारी सीमा देवीसोबत झालं होतं. लग्नानंतर दोघांना दोन मुले झाली.

Crime News : Husband cut off wife's nose with a sharp weapon in the affair of his girlfriend in UP | गर्लफ्रेंडसाठी कापलं पत्नीचं नाक, मग खिशात टाकून झाला फरार

गर्लफ्रेंडसाठी कापलं पत्नीचं नाक, मग खिशात टाकून झाला फरार

Crime News : उत्तर प्रदेश लखीमपूर खीरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने गर्लफ्रेंडसाठी पत्नीचं नाक कापलं. मग ते नाक घेऊन तो फरार झाला. त्यानंतर पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीला अटक केली.

मीडिया रिपोर्टनुसार, बांसताली गावात राहणाऱ्या विक्रमचं लग्न काही वर्षाआधी मोहम्मदाबाद गावात राहणारी सीमा देवीसोबत झालं होतं. लग्नानंतर दोघांना दोन मुले झाली. पण यादरम्यान विक्रमचं गावातील एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू झालं. जेव्हा हे सीमाला समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला.

दोघांमध्ये यावरून रोज भांडण होत होतं. पीडित पत्नीनुसार, शनिवारी रात्री साधारण 8 वाजता विक्रमने तिला जेवण बनवण्यास सांगितलं. तिने जेवण बनवलं. त्यानंतर पुन्हा त्या दुसऱ्या महिलेवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तेव्हाच विक्रमने याचा राग मुलीवर काढणं सुरू केलं. 

त्याने तिला मारहाण सुरू केली तर पत्नी सीमाने हस्तक्षेप केला. तेव्हाच विक्रमने धारदार शस्त्राने पत्नीचं नाक कापलं. मग ते नाक खिशात टाकून तो फरार झाला.

रक्ताने माखलेली सीमा त्याच स्थितीत पोलिसांकडे गेली आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Web Title: Crime News : Husband cut off wife's nose with a sharp weapon in the affair of his girlfriend in UP