'तो' आला अन् संसार उद्ध्वस्त केला; पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने स्वत:ला संपवलं; लेक झाला पोरका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:52 PM2021-10-23T15:52:27+5:302021-10-23T16:01:16+5:30

Crime News : पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News husband committed suicide on hearing this wife also tried but fail | 'तो' आला अन् संसार उद्ध्वस्त केला; पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने स्वत:ला संपवलं; लेक झाला पोरका

'तो' आला अन् संसार उद्ध्वस्त केला; पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने स्वत:ला संपवलं; लेक झाला पोरका

Next

नवी दिली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेमप्रकरणामुळे एक अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. भोपाळमध्ये ही भयंकर घटना घडली. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळल्यानंतर पत्नीने देखील टोकाचं पाऊल उचललं स्वतःला पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. यामुळे चार वर्षांचा चिमुकला आता पोरका झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या टीटीनगर परिसरात राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर हा लिफ्ट ऑपरेटरचं काम करतो. याचं काही वर्षांपूर्वी सुधा नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा मुलगादेखील आहे. अक्षयला गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांबाबत माहिती समजली होती. तेव्हापासून तो अस्वस्थ झाला होता. यातूनच त्याने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. आपल्या मुलाला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या आईने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि अक्षयला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

"पत्नी आणि चिमुकल्याला भेटण्यासाठी सागरच्या पाया पडलो पण..."

पोलिसांना अक्षयच्या रुममध्ये त्याने लिहिलेली एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नीने आपल्या विश्वासघात केल्याचं म्हटलं आहे. तिचं सागर नावाच्या एका व्यक्तीशी प्रेमप्रकरण होतं. त्यामुळे आपल्या मृत्यूला पत्नी आणि सागरचं जबाबदार असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. तसेच त्याची पत्नी सध्या सागरसोबत राहत असल्याने आपली पत्नी आणि चार वर्षीय चिमुकल्याला भेटण्यासाठी सागरच्या पाया पडलो पण त्याने मला भेटू दिलंच नाही असं म्हटलं आहे. 

अक्षयचा मित्र सागर आणि सुधा यांचे होते प्रेमसंबंध

2014 मध्ये अक्षय आणि सुधाचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना आता एक मुलगा देखील आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा मित्र सागर आणि सुधा यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. अक्षयच्या माध्यमातूनच त्यांची ओळख झाली होती आणि पुढे हळूहळू हे संबंध अधिक घट्ट होत गेले आणि त्यानंतर काही दिवसांनी सुधा आपल्या पतीला सोडून सागरसोबत राहायला गेली होती. त्यामुळेच निराश झालेल्या अक्षयने आत्महत्येचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News husband committed suicide on hearing this wife also tried but fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app