Crime News: वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून नातवाकडून आजीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 23:00 IST2022-08-13T23:00:03+5:302022-08-13T23:00:20+5:30
Crime News: फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध आजीचा तिच्याच नातवाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

Crime News: वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून नातवाकडून आजीचा खून
फलटण : फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध आजीचा तिच्याच नातवाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
मंगल बबन शिंदे (वय ६५, रा.ठाकुरकीमळा, ता. फलटण, जि.सातारा) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगल शिंदे याशनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी फलटण शहरातील विमानतळ येथे गेलेल्या होत्या. तेथे नातू आकाश सुखदेव शिंदे (रा.ठाकुरकी मळा ता. फलटण, जि. सातारा, हल्ली रा. आवी, ता.पंढरपूर, जि. सोलापुर) हा तेथे आला. त्याने काठीने आजीला मारहाण केली. त्यावेळी वृद्ध आजी मंगल शिंदे या जमिनीवर पडली असता, आकाशने एक मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. यात शिंदे या जागीच ठार झाल्या. या प्रकारानंतर काही नागरिकांनी आकाशचा पाठलाग केला. मात्र, तो सापडला नाही. परंतू त्यानंतर तो पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.