शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कुटुंब म्हणतंय हत्या, पोलीस म्हणताहेत आत्महत्या; 'तिच्या' मृत्यूचं गूढ उकलेना; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:01 IST

Crime News : मुलीच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर पोलीस आत्महत्या झाल्याचं म्हणत आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालयातील विभागात एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर पोलीस आत्महत्या झाल्याचं म्हणत आहेत. यामुळेच या मृत्यू प्रकरणाचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. गोरखपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभू यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत गळफास घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र नातेवाईकांनी हत्येची तक्रार दाखल केली आहे. 

दिनेश कुमार प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने गळफास घेतला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. आता मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून यामध्ये अँटीमाटम हँगिंग असं म्हटलं आहे. या प्रकरणी योग्य तो तपास केला जात आहे. मात्र कोणीही अफवा पसरवू नका असं म्हटलं आहे. भाजपाच्या डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांनी याप्रकरणाचा निष्पक्ष तपास करून न्याय देण्याची मागणी केली आहे. 

राधामोहन दास अग्रवाल यांनी "जेव्हा मी मुलीला पाहायला गेलो तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र तिचे पाय हे जमिनीला लागलेले होते. जर गळफास घेऊन मृत्यू झाला असता तर पाय जमिनीला लागलेच नसते. तसेच डोक्याच्या पाठीमागे एक जखमी होती. जी आत्महत्येमुळे झालेली नाही" असं म्हटलं आहे. विद्यार्थिनी परिक्षेसाठी याठिकाणी गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हत्येचाच आरोप केला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ

दिल्लीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश