Crime News: बालिकेवर शेजारच्याकडून अत्याचार; आईसह जीवे ठार मारण्याची दिली धमकी
By अझहर शेख | Updated: August 9, 2022 16:25 IST2022-08-09T16:24:01+5:302022-08-09T16:25:31+5:30
Crime News: एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका ५६वर्षाच्या इसमाने वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News: बालिकेवर शेजारच्याकडून अत्याचार; आईसह जीवे ठार मारण्याची दिली धमकी
- अझहर शेख
नाशिक - एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका ५६वर्षाच्या इसमाने वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को व अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (५६) असे संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला रस्त्यात एकटे गाठले. राहत्या घराच्या पाठीमागे घेऊन जात तेथे आईसह तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तिच्यावर शारिरिक, लैंगिक अत्याचार केले. ‘जर तु तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाके’ असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घयना २ ते ५ तारखेच्या दरम्यान घडली. बालिकेला शारिरिक त्रास होऊ लागल्याने तिला उपचारार्थ दाखल केले असता हा प्रकार समोर आला. पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी संशयित पाटील यास बेड्या ठोकल्या आहेत. त्यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख हे करीत आहेत.