धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:41 IST2025-10-27T16:08:57+5:302025-10-27T16:41:19+5:30
अमृता आणि मीना मे महिन्यापासून लिव्ह-इन पार्टनर म्हणून एकत्र राहत होते. काही महिने एकत्र राहिल्यानंतर अमृताला रामकेश मीनाने तिचे खासगी व्हिडीओ घेतल्याचे कळले.

धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
देशात मागील काही महिन्यात आपल्याच पतीची आणि बॉफ्रेंडची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील मुस्कान हिने आपल्याच पतीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर सोनम रघुवंशी प्रकरणही असेच घडले होते. आता दिल्लीच्या अमृताने तिच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. युपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुण रामकेश मीनाचा मृतदेह राजधानीच्या गांधी विहार परिसरातील एका जळालेल्या फ्लॅटमधून सापडला. एसीमध्ये स्फोट किंवा शॉर्ट सर्किटमुळे घरात आग लागली होती आणि एलपीजी सिलेंडरचाही स्फोट झाला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. हा स्फोट नसून हत्या केल्याचे समोर आले.
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
मीनाचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी तिघांना अटक केली. मुख्य आरोपी तिची २१ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर अमृता चौहान आहे, तिने फॉरेन्सिक सायन्समध्ये बीएससी केले आहे. अमृताचा माजी प्रियकर सुमित कश्यप (२७) आणि त्याचा मित्र संदीप कुमार (२९) यांनाही अटक करण्यात आली. हे तिघेही उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहेत.
एका खाजगी व्हिडिओमुळे अमृताने हेतू बदलला
अमृता आणि मीना मे महिन्यापासून लिव्ह-इन पार्टनर म्हणून एकत्र राहत होते. काही महिने एकत्र राहिल्यानंतर अमृताला रामकेश मीनाने तिचे खासगी व्हिडीओ घेतल्याचे कळले. अमृताने रामकेशला ते डिलीट करण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला. वारंवार विनंती करूनही रामकेशने ऐकण्यास नकार दिला. यानंतर अमृताने पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी भयंकर कट रचला.
एक्स बॉयफ्रेंडची मदत घेतली
अमृताने तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुमीतची मदत घेतली. त्याने त्याचा जवळचा मित्र संदीप यालाही मदतीसाठी बोलावले. हे तिघेही ५-६ ऑक्टोबरच्या रात्री मुरादाबादहून दिल्लीला आले.
तिघांचाही हत्येत सहभाग
ते तिघेही गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले. तिथे रामकेश राहत होता आणि आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनण्याची तयारी करत होता. तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्फोटापूर्वी दोन मुखवटा घातलेले पुरुष इमारतीत घुसल्याचे आढळले. त्यांच्या मागे एक तरुणी देखील दिसली. पहाटे २:५७ वाजता, आधी ती महिला आणि नंतर दोन तरुण इमारतीतून बाहेर पडताना दिसले. काही वेळातच, आग लागली यावेळी मोठा स्फोट झाला.
पोलिसांना यामुळे आला संशय
सीसीटीव्हीमध्ये आग लागण्यापूर्वी इमारतीत तीन जण प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसले. यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपास आणखी वाढवला. दरम्यान, फॉरेन्सिक चाचण्यांमधून हा अपघात नसून खून असल्याचे पुरावे समोर आले. पोलिसांनी मीनाच्या लिव्ह-इन पार्टनरची चौकशी सुरू केली आणि तिचा मोबाईल फोन नंबर तपासला तेव्हा त्यांना घटनेच्या वेळी ती जवळच असल्याचे आढळले. कॉल डिटेल्सची तपासणी केल्यानंतर आणखी संशय वाढला.
अमृताला पकडल्यानंतर झाला खुलासा
पोलिसांनी अमृताला पकडण्यासाठी मुरादाबादमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. १८ ऑक्टोबर रोजी तिला अटक केली. अटकेनंतर तिने गुन्हा कबूल केला. तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमित आणि त्याचा मित्र संदीप यांच्यासोबत मिळून आधी मीनाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर आग लावली.
शरीरावर तूप आणि दारू ओतली
अमृताने एक्स बॉयफ्रेंडसह मीनाच्या फ्लॅटवर आली आणि तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी त्याच्या शरीरावर तूप, तेल आणि दारू ओतली आणि आग लावली. त्यानंतर त्यांनी गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह उघडला आणि ते लगेच निघून गेले. खोलीत एलपीजी गॅस भरताच, एक मोठा स्फोट झाला आणि सर्व काही जळून खाक झाले.