Crime : अश्लिल चॅट करून लोकांना ठगणाऱ्या गँगचा पर्दाफाश; पती-पत्नी आणि तीन मुलींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:00 PM2021-10-23T12:00:49+5:302021-10-23T12:01:16+5:30

Crime News :अश्लिल चॅट करून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक. अश्लिल सामग्रीही केली जप्त.

crime news ghaziabad police busted gang blackmailed people fake id porn sites | Crime : अश्लिल चॅट करून लोकांना ठगणाऱ्या गँगचा पर्दाफाश; पती-पत्नी आणि तीन मुलींना अटक

Crime : अश्लिल चॅट करून लोकांना ठगणाऱ्या गँगचा पर्दाफाश; पती-पत्नी आणि तीन मुलींना अटक

Next
ठळक मुद्देअश्लिल चॅट करून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक.

लोकांचे न्यूड व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या एका गँगचा गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बऱ्याच काळापासून हा ग्रुप अशा प्रकरे लोकांना ठगण्याचं काम करत होता. गाझियाबाद पोलिसांनी राजकोटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर या गँगचा पर्दाफाश केला. तुषार नावाच्या एखा व्यक्तीनं राजकोटमध्ये एक तक्रार दाखल केली होती. त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून ८० लाख रूपये उकळण्यात आल्याचं त्यानं म्हटलं होतं.

गाझियाबाद पोलिसांनी या गँगचा म्होरक्या योगेश गौतम आणि त्याची पत्नी सपना गौतम यांना अटक केली. हे पती पत्नी अन्य राज्यातील लोकांना अश्लिल व्हिडीओ तयार करून ब्लॅकमेल करत होते. आतापर्यंत यांनी अनेकांकडून मिळून कोट्यवधी रूपये उकळले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या गँगकडून अनेक पॉर्न व्हिडीओ, आपत्तीजनक सामग्री, लॅपटॉ, मोबाईल, अश्लिल सीडी, मेमरी कार्ड, पेन ड्रायईव्ह, रोख रक्कम, चादीचे दागिने जप्त केले असून ८ बँक खात्यांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. ही गँग नाशिक, दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रिय होती. तसंच राजकोटमधील एका व्यक्तीला ठगून त्यांनी लाखो रूपये लूटले होते. 

मुलींकडून चुकीची कामं
या गँगच्या म्होरक्याची पत्नी काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याची आयडिया मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून पती पत्नी मिळून ही गँग चालवत होते. हे दोघं मुलांना पैसे देण्याचं आश्वासन देऊन अश्लिल व्हॉईस कॉल आणि न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास सांगत होते. यात जे लोक अडकायचे त्यांना पर्सनल व्हॉट्सअॅप क्रमांक देऊन अश्लिल व्हिडीओ चॅट करत होते, अशी माहिती गाझियाबाद सिटी एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जी मुलगी व्हिडीओ चॅट करायची तिला महिन्याला २५ हजार आणि जी केवळ कॉल करायची तिला महिन्याला १० हजार रूपये दिले जात होते. एका वेबसाईटवर आपला बनावट आयडी तयार करून हा प्रकार केला जात होता. एखाद्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढून नंतर धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जायची असंही पोलिसांनी सांगितलं.

Web Title: crime news ghaziabad police busted gang blackmailed people fake id porn sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.